भारतीय सेनादलांसाठी बॉम्ब हातबॉम्ब अग्निबाण दारूगोळा तसेच अद्ययावत शस्त्रास्त्रांचा साठा करणा-या विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील पुलगावातील केंद्रीय दारूगोळा भांडाराला ३१ मे रोजी भीषण आगा लागली. त्यामध्ये काही अधिकारी जवानांसह १६ जण ठार तर १७ हून अधिक नागरिक गंभीररित्या जखमी झाले.डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातील प्रोबेस या रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटात ११ जणांचा मृत्यू झाला तर १८३ जण जखमी झाले.काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना मारहाण केल्याप्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांना अटक चिपळूण येथे करण्यात आली.विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात तामिळनाडूमध्ये जयललिता. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी एकहाती लढा देत पुन्हा सिंहासन राखले तर आसाममध्ये भाजपाचे कमळ फुलले. केरळमध्ये एलडीएफचा लाल तारा उगवला तर काँग्रेसला पुद्दचेरी या एकाच राज्यात सत्ता मिळवता आली.मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबईतील न्यायालयात दुसरे आरोपपत्र दाखल केले. त्यात एनआयएने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना क्लीन चिट दिली तसेच कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यावरील मकोकातंर्गत आरोप हटवलेउत्तराखंड विधानसभेतील विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री हरिश रावत यांनी बहुमत सिद्ध केल्याचे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केल्यानंतर राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली.देशभरातील सर्व एमबीबीएस- बीडीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांपासूनच नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) या केंद्रीय स्तरावरील सामायिक प्रवेश परीक्षेतून करण्यात यावे असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने नीटवरील वादावर पडदा टाकला. राज्यस्तरीय सीईटीतून प्रवेश करू देण्याची विद्यार्थ्यांची न्यायालयाने फेटाळून लावल्याने राज्यातील सुमारे पावणेदोन लाख विद्यार्थ्यांना नीट-२ ला सामोरे जाण्याशिवाय पर्याय उरला नाही.एकीकडे गोवंश हत्या बंदीचा कायदा वैध ठरवतानाच परराज्यातून आणलेले गोवंशाचे मांस बाळगणे हा गुन्हा नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच त्याबाबतच्या दोन तरतुदीही न्यायालयाने रद्द केल्या.