Flash Back मार्च २०१४ By admin | Published: December 20, 2014 12:00 AM2014-12-20T00:00:00+5:302014-12-20T00:00:00+5:30Join usJoin usNext देशातील विद्यमान आमदार- खासदारांशी संबंधित कोणत्याही खटल्याचा निकाल वर्षभरात लावा त्यासाठी दररोज सुनावणी घ्यावी लागली तरी चालेल असा महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने सर्व कनिष्ठ न्यायालयांना दिला. छत्तीसगडमधील सुकमा- बस्तर सीमेवर माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफच्या ११ जवानांसह १५ जण शहीद झाले. मुंबईतील शक्ती मिल येथे टेलिफोन ऑपरेटरवर केलेल्या बलात्कार प्रकरणी न्यायालयाने ४ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्यातील तीन जणांनी एका फोटो जर्नालिस्टवरही बलात्कार केला होता. यातील मुख्य आरोपी सलीम अन्सारी विजय जाधव व कासिम बंगाली. आपण लोकसभा निवडणूक लढवून आपल्या पक्षाची ताकद दाखवून देणार आहोत असे सांगत देशहितासाठी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे केली. गुंतवणूकदारांचे २० हजार कोटी रुपये बुडवल्याचा आरोप ठेवत सहारा समूहाचे मालक सुब्रतो रॉय यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यात आला होतं काही दिवस पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर रॉय यांनी लखनऊ पोलिसांसमोर शरणागती पत्करली अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या १६ व्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आणि नरेंद्र मोदी विरुद्ध काँग्रेस असा रणसंग्राम सुरू झाला. क्वालालंपूरहून बीजिंग येथे जाणारे बोईंग 777-200 फ्लाईट एमएच 370 हे मलेशियन एअरलाईन्सचे विमान बेपत्ता झाले. या विमानात २२७ प्रवाशांसह एकूण २३९ जण होत ज्यात ५ भारतीयांचाही समावेश होता. या विमानाचा अनेक महिने शोध घेण्यात आला करोडो रुपये खर्च करण्यात आले पण शेवटपर्यंत त्याचा शोध लागू शकला नाही.