कैलाश सत्यार्थी व मलाला युसुफजाईचा नोबेलने सन्मान

By admin | Published: December 11, 2014 12:00 AM2014-12-11T00:00:00+5:302014-12-11T00:00:00+5:30

जगामधलं एकही मूल शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. मुलांच्या हातात बंदुका दिल्या जातात पण पुस्तकं का दिली नाही जात - मलाला युसुफजाई

जगात लष्करावरील एका आठवडय़ाच्या खर्चात आपल्या सर्व मुलांचे शिक्षण होऊ शकते. आता जागतिक पातळीवर मुलांचा विचार सहृदयतेने होण्याची गरज आहे - कैलाश सत्यार्थी

इस्लाममध्ये कधीही कुणाची हत्या करण्यास सांगितलेले नाही उलट एका माणसाला मारणे म्हणजे माणुसकीला मारणे असा उल्लेख कुराणात आहे. दहशतवादी इस्लामचा चुकीचा अर्थ लावत आहेत - मलाला युसुफजाई

जगात शांतता प्रस्थापित करायची असेल तर कोटय़वधी बालकांना स्वप्नं पाहण्याची आणि ती साकार करण्याची शक्ती द्यावी लागेल. आपण प्रत्येक जण हे काम नक्की करू शकतो. अशी हाक देणा-या कैलास सत्यार्थी यांच्या रूपाने १० डिसेंबर २०१४ रोजी नोबेल पारितोषिक वितरण समारंभात नॉर्वेमध्ये शांततेचा आवाज घुमला.

मलाला युसुफजाई ही माझी पाकिस्तानी मुलगी आहे आणि मी तिचा भारतीय पिता आहे असे भावनोत्कट उद्गार मलालासोबत संयुक्त नोबेल पारितोषिक स्वीकारताना कैलाश सत्यार्थी यांनी काढले.

कैलाश सत्यार्थी व मलाला युसुफजाई नॉर्वेची राणी सोन्जा व राजा हेराल्ड यांच्यासमवेत ओस्लोमधील रॉयल पॅलेसमध्ये.

प्रत्येकानं आपल्यामध्ये दडलेल्या मुलाला स्मरून जगातल्या पिडीत वंचित मुलांचं दु:ख हलकं करायला हवं असं आवाहन नोबेल पारितोषिक स्वाकरताना कैलाश सत्यार्थी यांनी केलं.

शांततेचा संयुक्त नोबेल पुरस्कार बालकामगारांना न्याय देण्यासाठी गेली तीन दशके झडणा-या भारताच्या कैलाश सत्यार्थी व मुलींच्या शिक्षणासाठी दहशतवाद्यांशी लढणा-या मलाला युसुफजाईला १० डिसेंबर २०१४ रोजी नॉर्वेमध्ये प्रदान करण्यात आला.