तथाकथित संत रामपाल अटकनाट्य

By admin | Published: November 19, 2014 12:00 AM2014-11-19T00:00:00+5:302014-11-19T00:00:00+5:30

रामपाल यांच्या भक्तांमध्ये महिला लहान मुले वृद्ध अशा सगळ्यांचा समावेश असून हरयाणा राजस्थान पंजाब व दिल्ली परीसरात त्यांचा भक्तसमुदाय पसरला आहे. आश्रमातून हिंसक कारवाया होत असल्या तरी मुलं व महिलांना ओलीस ठेवल्यामुळे पोलीसांच्या कारवाईवर मर्यादा आल्या.

आश्रमाची वीज - पाणी तोडल्यानंतर पोलीसांनी भक्त बाहेर येण्याची वाट बघितली. मात्र हिंसर भक्तांनी पोलीसांवर दगड विटांचा तसेच पेट्रोल बाँबचा व पिस्तुलामधून गोळ्यांचा मारा केला. दोन पोलीसांसह ६ भक्त या सगळ्यात मरण पावले.

हजारो भक्तांना रामपाल यांच्या जवळच्या भक्तांनी व सुरक्षारक्षकांनी ओलीस ठेवल्याचा दावा पोलीसांनी केला अखेर सुमारे १० हजार भक्तांना आश्रमाबाहेर काढण्यात यश आले आणि त्यांना पोलीसांनी सुखरूप रवाना केले.

रामपालना अटक करण्यासाठी पोलीस आले परंतु जवळपास १५ हजार समर्थकांनी आश्रमातून प्रतिकार केल्यामुळे पोलीसांना आश्रमाबाहेर वाट बघत बसावे लागले. हा प्रकार जवळपास दोन दिवस सुरू होता.

शेकडो रामपाल भक्तांनी त्यांच्यावर आलेलं संकट दूर टळावं आणि रामपालना अटक होऊ नये यासाठी धरण्याचा मार्ग अवलंबला.

रामपालांच्या आश्रमापासून दोन किलोमीटरवर पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आणि वाहनांची तपासणी करण्यात आली.

रामपालना अटक करण्यासाठी पोलीसांनी हरयाणातील बरमाल येथील आश्रमाला १८ नोव्हेंबर २०१४ रोजी मंगळवारी चारी बाजुंनी वेढले.

यापूर्वी खुनाच्या आरोपाखाली २२ महिने तुरुंगात घालवलेल्या रामपाल यांच्याविरोधात षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप रामपाल भक्त करत असून हजारोंच्या संख्येने ते पोलीसांना विरोध करत आहेत.

खुनाच्या आरोपाप्रकरणी आजामीनपात्र वॉरंट असलेल्या स्वयंघोषित संत रामपाल व त्यांच्या खास भक्तांनी हजारो भक्तांना ओलीस ठेवून पोलीसांना वेठीला धरले. मुलं व महिलांचा समावेश असलेल्या सहा भक्तांचा आश्रमात मृत्यू झाला. पोलीसांवर हल्ला केलेल्या रामपाल व त्यांच्या भक्तांवर देशाविरुद्ध युद्ध छेडल्याचा सगळ्यात गंभीर गुन्हा पोलीसांनी दाखल केला आहे.

तथाकथित संत रामपाल - यांच्या अटकप्रकरणात धार्मिक बाबा आणि त्यांचे सशस्र भक्तगण किती धोकादायक बनतात आणि राज्य सरकार कोर्ट व पोलीसांनादेखील न जुमानता हजारो भक्तांच्या श्रद्धेच्या बळावर स्वत:ची संस्थानं कशी चालवतात हे समोर आलं आहे.