निकालाची क्षणचित्रे..... By admin | Published: October 20, 2014 12:00 AM2014-10-20T00:00:00+5:302014-10-20T00:00:00+5:30Join usJoin usNext भाजपाच्या विजयाचा आनंद साजरा करणारा हा युवक.... विजयानंतर मुंबईतील भाजपा कार्यालयाबाहेर शायना एन.सी देवेंद्र फडणवीस आणि ओमप्रकाश माथूर यांची विजयी मुद्रा. भाजपाच्या यशानंतर फुगडी घालत जल्लोष करणारे कार्यकर्ते. विजयाची चव वेगळीच असते असे म्हणतात. भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात विजय साजरा केला. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही मोदी लाटेने भाजपाला यश मिळवून दिले. त्यानंतर नरिमन पॉईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयात विजयश्री साजरी करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी एकमेकांचे हात हातात घेऊन ऐक्याची साद देऊन विजयाचे पथनाट्य सादर केले. कुठे हसू तर कुठे आसू.. भाजपाच्या विजयाचा सर्वजण जल्लोष करत असताना काँग्रेसच्या अनेक नेत्यांना मात्र पराभव पत्करावा लागला. कॉँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांचा कुडाळ विधानसभा मतदारसंघात पराभव झाला तर त्यांचे पुत्र नितेश राणे कणकवली मतदारसंघातून विजयी झाले. नारायण राणे नितेश यांचे अभिनंदन करण्यासाठी गेले असता पित्याच्या पराभवाने व्यथित झालेल्या नितेश यांना अश्रू आवरणे मुश्कील झाले. दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांनी परळी येथून दणदणीत विजय मिळवला. भाजपाध्यक्ष अमित शाह यांची ही विजयी मुद्रा... विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भाजपाला अगदी स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी जनतेने त्यांच्याबाजूनेच कौल दिला आहे. या निवडणुकीत अनेक नवी समीकरणे पहायला मिळाली. कुठे अपेक्षितच निकाल दिसला तर कुठे दिग्गजांना अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. निवडणूक निकालाची ही खास क्षणचित्रे...