अमिताभ बच्चन - बॉलीवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांनीदेखील द ग्रेट गेट्सबे या इंग्रजी चित्रपटात छोटेखानी भूमिका साकारली आहे. मात्र हॉलीवूडऐवजी मला बॉलीवूडमध्येच काम करायला आवडते असे सांगत अमिताभ यांनी हॉलीवूडमध्ये काम करण्यास फारसे इच्छूक नसल्याचे संकेत दिले.ओम पुरी - सर्वाधिक पाश्चिमात्त्य सिनेमा करणारे बॉलीवूडचे कलाकार म्हणून ओम पुरी यांना ओळखले जाते. ओम पुरी यांनी आत्तापर्यंत २० हून अधिक विदेशी चित्रपटांमध्ये काम केल्याचे सांगितले जाते. सिटी ऑफ जॉय माय सन द फॅनाटीक ईस्ट इज ईस्ट वॉल्फ घोस्ट द डार्कनेस वॉर अशा चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.नसरुद्दीन शहा - नसरुद्दीन शहा हे त्यांच्या दर्जेदार अभिनयासाठी ओळखले जात असून हॉलीवूडकरांवरही त्यांची जादू पाहायला मिळते. द मॉन्सून वेडिंग द लीग ऑफ एक्स्ट्रा ऑर्डिनरी जेंटलमन द ग्रेट न्यू वंडरफूल या इंग्रजी चित्रपटांसोबतच झिंदा भाग या पाकिस्तानी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे.तब्बू - चीनी कम चाची ४२० अशा चित्रपटांमधून बॉलीवूडमध्ये नाव कमावणा-या अभिनेत्री तब्बूनेही नेमसेक लाईफ ऑफ पाय या या दोन इंग्रजी चित्रपटांमध्ये काम केले आहे.अनिल कपूर - बॉलीवूडमधील मिस्टर इंडिया अर्थात अनिल कपूर यांनी स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत सर्वांची वाहवा मिळवली. या चित्रपटाने ऑस्कर पुरस्कारांवरही वर्चस्व गाजवले होते. अनिल कपूर यांनी 24 या इंग्रजी मालिकेत काम केले असून याच मालिकेची हिंदी आवृत्ती त्यांनी भारतात सुरु केली होती.मल्लिका शेरावत - बॉलीवूडमध्ये बोल्ड भूमिका साकारुनही फारसा प्रभाव टाकू न शकलेली मल्लिका शेरावत हॉलीवूडमध्ये चालली. जॅकी चॅनचा द मिथ या इंग्रजी चित्रपटासोबतच हिस या चित्रपटातही तिने काम केले आहे.ऐश्वर्या रॉय बच्चन - सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणा-या ऐश्वर्या रॉयच्या सौदर्याची जादू हॉलीवूडवरही पाहायला मिळाली. मिस्ट्रेस ऑफ स्पाईसेस द पिंक पँथर टू व प्रोव्होक्ड अशा इंग्रजी चित्रपटांमधील अभिनयाने ऐश्वर्याने हॉलीवूडची दाद मिळवली.इरफान खान - दमदार अभिनयाने बॉलीवूड गाजवणारा अभिनेता इरफान खान जूरासिक पार्क या इंग्रजी चित्रपटात झळकला आहे. बॉलीवूडप्रमाणेच इरफान आता हॉलीवूडमध्येही चांगलाच स्थिरावला असून नेमसेक वॉरिअर ऑल मायटी लाईफ ऑफ पाय अशा विविध इंग्रजी चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. हॉलीवूडमध्ये काम करणा-या देसी कलाकारांचा घेतलेला हा आढावा...