ओम पुरी यांच्या निधनामुळे संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टी दुःखात बुडाले आहे. सर्व क्षेत्रांतील दिग्गजांनी ओम पुरी यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामगिरीची दखल घेत केंद्र सरकारने १९९० साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.ओम पुरी यांनी फक्त बॉलिवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूडमध्येही अनेक चित्रपटात काम केले होतेसंपूर्ण जगभरात गाजलेल्या गांधी या चित्रपटात ओम पुरी यांनी नहारीची भूिमाक साकारली होती.अर्धसत्यमधील अनंत वेलणकर या इन्स्पेक्टरच्या भूमिकासाठी त्यांना १९८३ साली सर्वोत्तम अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.चाची ४२० चित्रपटात कमल हसनची चाची आणि ओम पुरी यांनी साकारलेल्या बनवारीलाल यांच्यातील गमतीदार बाचाबाची सर्वांच्याच लक्षात राहिली.समांतर सिनेमांपासून ते कमर्शिअल चित्रपटांपर्यंत लीलया अभिनय करत यश मिळवणा-या अभिनेत्यांमध्ये ओम पुरी यांचा समावेश होता. त्यांनी फक्त बॉलिवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूडमध्येही अनेक चित्रपटात काम केलेघाशीराम कोतवाल या मराठी चित्रपटातील घाशीरामची भूमिका ओम पुरी यांनी साकारली होती. हा त्यांचा पहिलाच सिनेमा.१८ ऑक्टोबर १९५० साली हरियाणातील अंबाला येथे ओम यांचा जन्म झाला. त्यांनी पंजाबमधील पटियाला येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे हृद.विकाराच्या झटक्याने निधन झालं.