26 एप्रिल : काँग्रेसचे माजी खासदार नीलेश राणे त्यांचा स्वीय सहायक व अंगरक्षकाने पक्षाच्या चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना बेदम मारहाण केल्याचे उघडकीस आले होते25 एप्रिल : मालेगावमधील मशिदीबाहेर 2006 मध्ये घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी 8 आरोपींना विशेष मोक्का न्यायालयाने दोषमुक्त केले होते19 एप्रिल : 58 वर्ष पूर्ण होईपर्यंत कर्मचा-याला रक्कम काढू न देणारा फतवा भाजप सरकारने मागे घेतला होता. याविरोधात कर्नाटकात वस्त्रोद्योग कामगारांकडून आंदोलनाचा भडका उडाला होता17 एप्रिल : लातूरच्या दुष्काळ दौ-यावर असताना "सेल्फी" काढल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती16 एप्रिल : देवनारकचराभूमीला लागलेल्या आगप्रकरणी पोलिसांनी 9 भंगार व्यापा-यांना अटक केली होती13 एप्रिल : आयपीएलचे 30 एप्रिलनंतरचे सर्व सामने महाराष्ट्राबाहेर खेळवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने बीसीसीआयला दिले होते. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असतानाही खेळपट्ट्यांच्या देखभालीसाठी यावेळी मोठ्या प्रमाणात नासाडी होत होती12 एप्रिल : पाणीटंचाइने मेटाकुटीला आलेल्या लातूरवासियांसाठी तब्बल 5 लाख लिटर पाणी घेऊन "जल एक्स्प्रेस" लातूरमध्ये दाखल झाली होतीसुप्रीम कोर्टाने डान्सबारवरील बंदी उठवल्यानंतर डान्सबारना परवाने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र अश्लील नृत्य आणि अनैतिक कृत्यांवर बंदी घालण्यात आली10 एप्रिल : केरळमधील परावायूर येथील पुत्तिंगल देवी मंदिराच्या संकुलात लागलेल्या भीषण आगीत 106 भाविकांचा मृत्यू झाला होता तर 380 जण जखमी झाले होते4 एप्रिल : जम्मू काश्मीरच्या तेराव्या मुख्यमंत्री म्हणून मेहबूबा मुफ्ती यांनी शपथध घेतली. त्यांच्या रुपाने राज्याला पहिल्या महिला मुख्यमंत्री लाभल्या आहेत3 एप्रिल : पठाणकोट हल्ल्याच्या तपासकामात सक्रिय सहभाग असलेल्या मोहम्मद तंझील अहमद या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) अधिका-याची अज्ञातांनी तब्बल 24 गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली3 एप्रिल : वेस्ट इंडिज संघाने इंग्लंडवर 4 विकेट्स राखून सनसनाटी विजय मिळवून टी 20 विश्वचषकावर दुस-यांदा आपले नाव कोरले3 एप्रिल - पनामा पेपर्सच्या यादीत अमिताभ बच्चन ऐश्वर्या राय-बच्चनसहीत 500 भारतीयांचे नावे आली होती8 एप्रिल : गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर 400 वर्षांची भेदभावाची परंपरा मोडीत काढून शनिदेवाच्या चौथ-यावर महिलांनाही प्रवेश देण्याचा निर्णय विश्वस्तांनी घेऊन अंमलात आणला2 एप्रिल - शनिशिंगणापूर येथे चौथ-यावर जाऊन दर्शन घेण्यासाठी गेलेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई व अन्य महिलांना मारहाण. यानंतर 3 एप्रिलरोजी पुरुषांनाही त्रंब्यकेश्वरच्या गाभा-यात बंदी घालण्यात आली होती1 एप्रिल - संपूर्ण बिहार राज्यात दारूबंदी लागू करण्यात आली1 एप्रिल - "बालिकावधू" फेम प्रत्युषा बॅनर्जीने गोरेगावातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती