स्वतःच्या हिमतीवरच आम्ही राजकारण करतो : संदेश पारकर यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 06:12 PM2019-05-21T18:12:36+5:302019-05-21T18:13:41+5:30

ठेकेदारांकडून पैसे घेऊन आम्ही कधीच राजकारण करीत नाही. स्वतःच्या हिमतीवर व जनतेच्या आशीर्वादावरच आमचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे महामार्ग चौपदरीकरण कामाच्या विषयी आम्ही केलेल्या आंदोलनावरून आमच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांनी आधी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे आणि मगच आमच्यावर टीका करावी. विरोधक सक्षमपणे आपली भूमिका बजावत नसल्याने आम्ही सत्ताधारी असलो तरी जनहितासाठी आम्हाला आंदोलन करावे लागत आहे. असा टोला भाजप नेते संदेश पारकर यांनी लगावला आहे.

 We are politics only on our own interests: the message crosses the population | स्वतःच्या हिमतीवरच आम्ही राजकारण करतो : संदेश पारकर यांचा टोला

स्वतःच्या हिमतीवरच आम्ही राजकारण करतो : संदेश पारकर यांचा टोला

Next
ठळक मुद्दे स्वतःच्या हिमतीवरच आम्ही राजकारण करतो : संदेश पारकर यांचा टोला विरोधक सक्षम नसल्यानेच आमचे आंदोलन

कणकवली : ठेकेदारांकडून पैसे घेऊन आम्ही कधीच राजकारण करीत नाही. स्वतःच्या हिमतीवर व जनतेच्या आशीर्वादावरच आमचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे महामार्ग चौपदरीकरण कामाच्या विषयी आम्ही केलेल्या आंदोलनावरून आमच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांनी आधी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे आणि मगच आमच्यावर टीका करावी. विरोधक सक्षमपणे आपली भूमिका बजावत नसल्याने आम्ही सत्ताधारी असलो तरी जनहितासाठी आम्हाला आंदोलन करावे लागत आहे. असा टोला भाजप नेते संदेश पारकर यांनी लगावला आहे.

महामार्ग चौपदरीकरण कामाविषयी निर्माण झालेल्या समस्या तत्काळ सोडवाव्यात अशी मागणी करीत शिवसेना - भाजप युतीने कणकवलीत आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. यावरून मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर व काँग्रेस प्रवक्ते काका कुडाळकर यांनी टीका केली होती. त्या टीकेला संदेश पारकर यांनी मंगळवारी येथील भाजप संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष संदेश सावन्त- पटेल , नगरसेवक रुपेश नार्वेकर, महेश सावन्त, प्रसाद अंधारी आदी उपस्थित होते.

संदेश पारकर पुढे म्हणाले, महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाविषयी आम्ही जनआंदोलन केल्यावर त्या कामाला गती आली आहे. मात्र, या जनआंदोलनानंतर काही विरोधी राजकीय नेत्यांनी प्रसिद्धीमाध्यमाद्वारे टीका केली आहे. महामार्ग चौपदरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेपासून आम्ही जनहितासाठी आंदोलने करीत आहोत. त्यामुळे आम्हाला आता जाग येण्याचा प्रश्नच नाही. तसेच काही नेत्यांना महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने चारचाकी गाड्या भेट दिल्या असून त्यांची वैधता संपल्याने पुन्हा त्यानी आंदोलने सुरू केली आहेत.अशी टीका मनसेचे नेते परशुराम उपरकर व काँग्रेसचे प्रवक्ते काका कुडाळकर यांनी केली होती.

मात्र, जनतेच्या समोर सत्य यावे म्हणून मी सांगू इच्छितो की, महामार्गाच्या कोट्यावधी रुपयांच्या कामासाठी आम्ही किरकोळ चारचाकी गाडी घेऊन ठेकेदाराला मनमानी करायला देऊ असे म्हणणे हे मूर्खपणाचे आहे. बँकेचे कर्ज काढूनच मी चारचाकी गाडी घेतली आहे. त्या कर्जाचा दरमहा हप्ता बँकेत भरला जात आहे. अजून १६ लाख रुपये कर्ज शिल्लक आहे. त्याची पडताळणी संबधित बँकेत जाऊन कोणीही करू शकतो.

आम्ही राजकारण पारदर्शकपणे करीत असतो. गाड्यांबाबत जर कोणाला माहिती हवी असेल तर संबधित ठेकेदाराला त्यांनी विचारावे. या कामात काही देवघेव झाली असेल, भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी करण्यात यावी. महामार्ग ठेकेदाराने कोणाचे वैयक्तिक रस्ते केले . कोणाला डँपर द्वारे माती पुरविली. याचीही चौकशी व्हावी . म्हणजे नेमके सत्य बाहेर येईल.

महामार्ग चौपदरीकरण कामाबाबतच्या समस्या सोडविण्यासाठी ३१ मे पर्यंत 'डेडलाईन' आम्ही दिली आहे. तोपर्यँत समस्या न सुटल्यास जनआंदोलन करण्यात येईल.

झाराप ते खारेपाटण या परिसरातही महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून त्याची प्रत्यक्ष पाहणी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी करावी. तसेच संबंधीत ठेकेदारावर कारवाई करावी. असेही संदेश पारकर यांनी यावेळी सांगितले.

हिंमत असेल तर तुम्ही आंदोलन करा!

आमच्यावर टीका करणारे विरोधक जनहितासाठी काही करीत नाहीत . त्यामुळे आम्हाला आंदोलन करावे लागत आहे. विकास कामे आमचे सरकार करीत असून स्थानिक पातळीवर त्या विकास कामे करणाऱ्यांवर दर्जेदार काम व्हावे यासाठी अंकुश ठेवण्याचे काम आम्ही करीत आहोत. विरोधकामध्ये हिंमत असेल तर त्यांनी आंदोलन करावे .असा टोला संदेश पारकर यांनी यावेळी लगावला.

जनता भरडली जाऊ नये ही भूमिका !

जिल्ह्याचा विकास होत असताना सर्वसामान्य जनता भरडली जाऊ नये.अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी आम्ही आंदोलन करीत आहोत. परशुराम उपरकर हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आम्ही केलेल्या जनहीतासाठीच्या आंदोलनात सहभागी होणे गरजेचे होते. मात्र , तसे झाले नाही. काका कुडाळकर यांनी नुसती टीका करण्यापेक्षा ते जर लोकसभा प्रचारासाठी जिल्ह्यात सक्रियपणे फिरले असते तर काँग्रेसच्या मतात वाढ झाली असती.त्याचबरोबर जनमतही त्यांना समजले असते. या दोघांनी जनतेच्या समस्या घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करावे . असेही संदेश पारकर यावेळी म्हणाले.

Web Title:  We are politics only on our own interests: the message crosses the population

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.