‘म्हाडा’ची ‘संरक्षक भिंत’ अनधिकृत, प्रतीक्षा कारवाईची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 07:23 AM2018-01-29T07:23:05+5:302018-01-29T07:23:27+5:30

मालकी नसलेल्या जागेवर असलेली दुकाने आणि घरे तोडून, त्या ठिकाणी ‘संरक्षित भिंत’ उभारण्याचा पराक्रम म्हाडाच्या कार्यकारी अभियंता (गोरेगाव विभाग) यांनी केला. यात म्हाडाच्या अन्य अधिका-यांचाही समावेश आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात सप्टेंबर-२०१७ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, म्हाडाकडून मात्र याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.

 Unauthorized, waiting action of MHADA's 'guard wall' | ‘म्हाडा’ची ‘संरक्षक भिंत’ अनधिकृत, प्रतीक्षा कारवाईची

‘म्हाडा’ची ‘संरक्षक भिंत’ अनधिकृत, प्रतीक्षा कारवाईची

googlenewsNext

- गौरी टेंबकर-कलगुटकर
मुंबई : मालकी नसलेल्या जागेवर असलेली दुकाने आणि घरे तोडून, त्या ठिकाणी ‘संरक्षित भिंत’ उभारण्याचा पराक्रम म्हाडाच्या कार्यकारी अभियंता (गोरेगाव विभाग) यांनी केला. यात म्हाडाच्या अन्य अधिका-यांचाही समावेश आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात सप्टेंबर-२०१७ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, म्हाडाकडून मात्र याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे या ‘संरक्षक भिंती’वर कारवाई कोण आणि कधी करणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
गोरेगावच्या मोतीलालनगर-२ परिसरात १अ/१५९ सीटीएस क्रमांकावर अन्वर दफेदार यांचे घर आणि दुकान होते. यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, म्हाडाच्या अधिकाºयांनी या जमिनीवरील त्यांचे घर आणि दुकान तोडून, त्या ठिकाणी एक संरक्षित भिंत उभारली. दफेदार यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे घर आणि दुकान असलेल्या जमिनीच्या शेजारी असलेल्या तुकड्यावर तोडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती दफेदार यांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी म्हाडाला ३ मे २०१६ रोजी एक पत्र लिहिले. यात त्यांनी ‘माझे घर आणि दुकान हे म्हाडाच्या जागेवर नाही. तरी त्यावर कारवाई करण्यात येणार असल्यास मला कळवावे,’ अशी विनंती केली होती. मात्र, ते धार्मिक कार्यासाठी बाहेरगावी गेल्यानंतर, म्हाडाने गोरेगाव पोलिसांकडून मनुष्यबळ मागवत, त्या जमिनीवरील घर आणि दुकान पाडले.
दफेदार घरी परतल्यानंतर माहितीच्या आधाराचा वापर करत, जमीन म्हाडाच्या मालकीची आहे का, याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातून माहिती मागविली. तेव्हा ती जमीन म्हाडाची नसल्याचे उत्तर त्यांना मिळाले. यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी पालिकेकडून घेण्यात आली नसल्याचेही माहिती अधिकारातून स्पष्ट झाले. दरम्यान, २९ सप्टेंबर २०१७ रोजी म्हाडाच्या गोरेगाव विभागामधील कार्यकारी अभियंत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा अभियंता सिद्धार्थनगर ‘पत्राचाळ’ प्रकरणात निलंबित असून, हे पद सध्या रिक्त आहे, असे म्हाडाच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.

दफेदार हे १५ मे २०१७ मध्ये हज यात्रेसाठी सौदीला जाण्यास निघाले. मात्र, त्यापूर्वीच ३ मे रोजी त्यांनी म्हाडाला पत्र देत, ‘माझे घर आणि दुकान म्हाडाच्या जागेवर नाही, तरी तुम्ही तोडक कारवाई करणार असाल, तर मला याबाबत नोटीस द्यावी,’ अशी विनंती केली. मात्र त्यानंतर, म्हाडाने त्यांना काहीच कळविले नाही आणि १७ मे रोजी कारवाई केली. ‘मैं हजसे वापस आया, तब पता चला के मेरा आशियाना उजड चुका है...’ असे दफेदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

आम्ही या प्रकरणी पालिकेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास अधिकाºयाने म्हाडाकडून काही कागदपत्रांची मागणी केली होती. मात्र, त्यांनी ते अद्याप आम्हाला पुरविले नसल्याने, पुढील कारवाईत अडथळे येत आहेत.
- धनाजी नलावडे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
गोरेगाव पोलीस ठाणे.

पालिकेची परवानगीच नव्हती

दफेदार यांनी माहितीच्या अधिकाराखाली मागविलेल्या माहितीत, म्हाडाने पालिकेकडून कोणतीही परवानगी न घेता, संबंधित भिंतीचे बांधकाम केल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार, पालिकेच्या पी-दक्षिण विभागाने या प्रकरणी म्हाडाच्या संबंधित कार्यकारी अभियंत्यावर २३ सप्टेंबर २०१७ मध्ये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पी-दक्षिणच्या सहायक आयुक्त चंदा जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया मिळाली नाही.

म्हाडाचे सहमुख्याधिकारी संजय भागवत यांच्याशीही ‘लोकमत’ने संपर्क साधला. यावर त्यांनी सांगितले, जमीन कोणाची आहे, हे ठरविण्याचा अधिकार जिल्हाधिकाºयांना कोणी दिला, जमिनीचे ‘टायटल’ न्यायालय ठरवेल. जर म्हाडाने संरक्षित भिंत उभारली आणि जर ती जागा जिल्हाधिकारी कार्यालयाची असेल, तर त्यावर सुरक्षित भिंत बांधल्यास काय चुकीचे झाले. त्या ठिकाणी अनधिकृत झोपड्या उभ्या राहणार नाहीत. जे वाद आहेत, ते पुढे स्पष्ट होतील.

Web Title:  Unauthorized, waiting action of MHADA's 'guard wall'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.