जेथे जागा मिळेल तेथे रिफायनरी प्रकल्प होईल : सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 04:09 PM2019-03-15T16:09:18+5:302019-03-15T16:12:18+5:30

रिफायनरी प्रकल्पाला आमचा विरोध नाही.स्थानिकांना तो नको असल्याने नाणार येथून तो हटवला आहे.महाराष्ट्रात जेथे जागा उपलब्ध होईल तेथील स्थानिकांचा विरोध नसेल तर निश्‍चितपणे रिफायनरी प्रकल्प होईल.तसेच आडाळी येथे पुढील कालावधीत गोव्यातील उद्योग येणार आहेत.त्याबाबत जागेचीही निश्‍चिती झाल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

There will be a refinery project in place where the seats will be given: Subhash Desai | जेथे जागा मिळेल तेथे रिफायनरी प्रकल्प होईल : सुभाष देसाई

जेथे जागा मिळेल तेथे रिफायनरी प्रकल्प होईल : सुभाष देसाई

Next
ठळक मुद्देजेथे जागा मिळेल तेथे रिफायनरी प्रकल्प होईल : सुभाष देसाई आडाळी एमआयडीसीमध्ये गोव्यातील उद्योग येणार

कणकवली : रिफायनरी प्रकल्पाला आमचा विरोध नाही.स्थानिकांना तो नको असल्याने नाणार येथून तो हटवला आहे.महाराष्ट्रात जेथे जागा उपलब्ध होईल तेथील स्थानिकांचा विरोध नसेल तर निश्‍चितपणे रिफायनरी प्रकल्प होईल.तसेच आडाळी येथे पुढील कालावधीत गोव्यातील उद्योग येणार आहेत.त्याबाबत जागेचीही निश्‍चिती झाल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

येथील विजय भवन येथे शिवसेना पदाधिकार्‍यांनी महत्वाची बैठक झाली.यानंतर देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर,खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देसाई म्हणाले,नाणार परिसरातील नागरिकांना नाणार प्रकल्प नको असल्याने तो रद्द केला.सध्या तेथे प्रकल्पासाठी जागा देण्याबाबत हमीपत्रे लिहून घेतली जात आहेत.पण प्रकल्पच रद्द झाल्याने या हमीपत्रांचा उपयोग नाही.आम्ही रिफायनरी प्रकल्पा विरोधात नाही जर महाराष्ट्रात जेथे जागा उपलब्ध होईल तेथे हा प्रकल्प होण्यास आमची कोणतीही हरकत नसेल.

आडाळी येथे उद्योग येण्याबाबत आम्ही नुकतीच गोव्यातील उद्योजकांची भेट घेतली.गोव्यात उद्योग उभारण्यासाठी जागाच उपलब्ध नाही त्यामुळे तेथील उद्योजक आडाळी येथे येणार आहेत.या उद्योजकांना लागणार्‍या जागेचीही निश्‍चिती आडाळी येथे करण्यात आली असल्याचे देसाई म्हणाले.

सिंधुदुर्ग रत्नागिरी भाजप व इतर काही युतीमधील पक्ष नाराज असले तरी त्यांची समजूत काढण्याचे काम वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. पुढील काही दिवसांत शिवसेनेसोबत भाजप,आरपीआय आदींचेही झेंडे आणि पदाधिकारी प्रचारामध्ये सक्रीय झालेले दिसतील असेही .देसाई म्हणाले.

Web Title: There will be a refinery project in place where the seats will be given: Subhash Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.