स्वच्छ भारत अभियानासाठी सावंतवाडी शहरात २ कोटी ७४ लाख खर्च होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:53 PM2018-12-20T12:53:03+5:302018-12-20T12:56:45+5:30

स्वच्छ भारत अभियानअंतर्गत सावंतवाडी नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी मंजूर झालेल्या २ कोटी ७४ लाख रूपयांच्या निधीतून शहरात बायोगॅस प्रकल्प व चार गाड्या तसेच एक लोडर खरेदी करण्यात येणार असून पालिकेने शहर स्वच्छतेवर जास्तीत जास्त भर दिला असल्याची माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.

For Swachh Bharat Abhiyan, Sawantwadi will spend Rs 2.74 crore for the city | स्वच्छ भारत अभियानासाठी सावंतवाडी शहरात २ कोटी ७४ लाख खर्च होणार

स्वच्छ भारत अभियानासाठी सावंतवाडी शहरात २ कोटी ७४ लाख खर्च होणार

googlenewsNext
ठळक मुद्देघनकचरा व्यवस्थापनासाठी निधी मंजूर : बबन साळगावकर यांची माहिती स्वच्छ भारत अभियानासाठी सावंतवाडी शहरात २ कोटी ७४ लाख खर्च होणार

सावंतवाडी : स्वच्छ भारत अभियानअंतर्गत सावंतवाडी नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी मंजूर झालेल्या २ कोटी ७४ लाख रूपयांच्या निधीतून शहरात बायोगॅस प्रकल्प व चार गाड्या तसेच एक लोडर खरेदी करण्यात येणार असून पालिकेने शहर स्वच्छतेवर जास्तीत जास्त भर दिला असल्याची माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.

नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या कक्षात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विकासकामांची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, शहरात जमा होणाऱ्या कचर्‍यावर प्रक्रिया करणारे सहा प्रकल्प शहरात उभे करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून २४ तासात खत निर्मिती होणार आहे. शहरातील भाजी मार्केट, मच्छिमार्केट, नरसोबा मंदिर, गोठण, जुस्तीननगर, सर्वोदयनगर, बाहेरचावाडा आदी ठिकाणी हा प्रकल्प होणार असून, प्रायोगिक तत्त्वावर एक प्रकल्प सध्या सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पालिकेच्या जिमखाना येथील मनुष्यबळ विकास केंद्र्रात स्ट्रीम कास्ट ही कंपनी १ कोटी २५ लाख रुपये खर्च करून शहरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरविणार आहे. त्याचे काम लवकरच सुरु होणार आहे. तर सावंतवाडी शहर सुका व ओला कचरा वर्गीकरण करणारे शहर असून, जवळपास ९८ टक्के सुका व ओला कचरा वर्गीकरण करण्यात येतो.

नागरिकांचेही यासाठी सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सक्षम असे घनकचरा व्यवस्थापन करणारी सावंतवाडी नगरपालिका असून, भविष्यात कचºयावर प्रक्रिया करणारी नगरपालिका म्हणून सावंतवाडी पालिकेचे नाव घेतले जाईल, अशी आशाही साळगावकर यांनी बोलून दाखवली.

कचर्‍यावर प्रक्रिया करून तयार होणारे खत दहा रुपये व वीस रुपये किलोने विक्री करून त्यातून आर्थिक उन्नतीही पालिका साधणार असल्याचे साळगावकर यांनी यावेळी सांगितले.

एजी डॉटर्सबाबत अद्याप विचार नाही!

कचर्‍यावर प्रक्रिया करणार्‍या एजी डॉटर्स या कंपनी संदर्भात पालिकेने अद्याप कोणताच विचार केलेला नाही. पालिकेने कचर्‍यावर प्रकल्प करणारी स्वत:ची यंत्रणा उभी केल्याने भविष्यात कणकवली नगरपालिकेने स्वीकारलेल्या या कंपनीच्या कामकाजानुसार पाहणी करून योग्य विचार केला जाईल, असे साळगावकर यांनी सांगितले.

Web Title: For Swachh Bharat Abhiyan, Sawantwadi will spend Rs 2.74 crore for the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.