सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 08:19 PM2018-08-16T20:19:05+5:302018-08-16T20:20:12+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात २७.३७ मिलीमीटर सरासरी पाऊस झाला असून १ जूनपासून आतापर्यंत २५७६.२ मिलीमीटर सरासरी एकूण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे.

Strong recourse of rain in Sindhudurg district | सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमन

Next
ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमनचोवीस तासात २७.३७ मिलीमीटर सरासरी पाऊस

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात २७.३७ मिलीमीटर सरासरी पाऊस झाला असून १ जूनपासून आतापर्यंत २५७६.२ मिलीमीटर सरासरी एकूण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे.

गेल्या चोवीस तासात तालुकानिहाय झालेल्या पावसामध्ये दोडामार्ग २८ (२५२४), सावंतवाडी ३२ (२८२0), वेंगुर्ला ३७ (२३६३.९), कुडाळ ४0 (२४९६.८), मालवण २५ (२२५४), कणकवली ३३ (२७00), देवगड 0६ (२६८५), वैभववाडी १८ (२७६६) असा पाऊस झाल्याची नोंद आहे.

दोडामार्ग तालुक्यातील तिलारी आंतरराज्य धरण ८९.१३ टक्के भरले असून या धरणामध्ये सध्या ३९८.७१८0 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. सध्या या धरणातून १९२.५२ दशलक्ष घनमीटर प्रती सेकंद इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तिलारी धरण क्षेत्रात गेल्या चोवीस तासात ७0.0६ मिलीमीटर पाऊस झाला असून १ जूनपासून आतापर्यंत ३१.७३८६ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

देवघर धरणात ६0.२९५0 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा झाला आहे. कोर्ले सातंडी धरण १00 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील लघुपाटबंधारे प्रकल्पांपैकी शिवडाव, नाधवडे, आडेली, आंबोली, हातेरी, माडखोल, निळेली, सनमटेंब, पावशी, शिरवल, पुळास, वाफोली, हरकुळ, तिथवली व लोरे हे बंधारे १00 टक्के भरल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Strong recourse of rain in Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.