सिंधुदुर्ग : दुरुस्तीसाठी ठेवलेल्या होड्या जाळण्याचा अधिकार तहसीलदारांना कुणी दिला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 01:31 PM2019-01-10T13:31:45+5:302019-01-10T13:32:49+5:30

मालवण तहसीलदार आणि त्यांचे पथक सध्या कर्ली खाडीत होड्या जाळण्याची करत असलेली कारवाई अतिशय अन्यायकारक आणि वाळू व्यावसाईकांची दडपशाही करणारी आहे. नदीपात्रात दुरुस्तीसाठी उभ्या करून ठेवलेल्या होड्या जाळण्याचा अधिकार तहसीलदारांना कुणी दिला? असा संतप्त सवाल काळसे बागवाडी येथील बाळराजे फायबर्स आणि बोट बिल्डर्सचे मालक उल्हास नार्वेकर यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांना विचारला आहे.

Sindhudurg: Who gave Tahsilardar the right to burn hawks for repairs? | सिंधुदुर्ग : दुरुस्तीसाठी ठेवलेल्या होड्या जाळण्याचा अधिकार तहसीलदारांना कुणी दिला ?

सिंधुदुर्ग : दुरुस्तीसाठी ठेवलेल्या होड्या जाळण्याचा अधिकार तहसीलदारांना कुणी दिला ?

googlenewsNext
ठळक मुद्देदुरुस्तीसाठी ठेवलेल्या होड्या जाळण्याचा अधिकार तहसीलदारांना कुणी दिला ?होड्या जाळण्याची कारवाई अन्यायकारक :उल्हास नार्वेकर

सिंधुदुर्ग : मालवण तहसीलदार आणि त्यांचे पथक सध्या कर्ली खाडीत होड्या जाळण्याची करत असलेली कारवाई अतिशय अन्यायकारक आणि वाळू व्यावसाईकांची दडपशाही करणारी आहे. नदीपात्रात दुरुस्तीसाठी उभ्या करून ठेवलेल्या होड्या जाळण्याचा अधिकार तहसीलदारांना कुणी दिला? असा संतप्त सवाल काळसे बागवाडी येथील बाळराजे फायबर्स आणि बोट बिल्डर्सचे मालक उल्हास नार्वेकर यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांना विचारला आहे.

मंगळवार ८ जानेवारी रोजी मालवण तहसीलदार समीर घारे यांच्या नेतृत्वाखाली महसूलच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात अनधिकृत वाळू उत्खनना विरोधात काळसे बागवाडी येथे कारवाई करून एक होडी जाळली. या कारवाई नंतर उल्हास नार्वेकर यांनी होडी मालकांची बाजू मांडताना वरील प्रतिक्रिया दिली.

जिल्ह्यात घरबांधणी रखडली

आॅक्टोबर महिन्यात वाळू लिलाव होणे अपेक्षित असताना अजूनही वाळू लिलाव न झाल्यामुळे जिल्ह्यात घरबांधणीची कामे तसेच अनेक विकासकामे रखडली आहेत. तसेच अधिकृतरित्या व प्रामाणिकपणे वाळू व्यवसाय करणाऱ्या बेरोजगार तरुणांवर उपासमारीची वेळ आली आहे. याची दखल महसूल अधिकारी का घेत नाहीत? का त्यांना फक्त होड्या जाळण्यात व बुडवण्यातच धन्यता वाटत आहे? असे सवाल वाळू व्यावसाईक उल्हास नार्वेकर यांनी केले आहेत.

Web Title: Sindhudurg: Who gave Tahsilardar the right to burn hawks for repairs?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.