सिंधुदुर्ग : समुद्रकिनारी बेवारस सिलिंडर आढळला, बॉम्बशोधक पथकाकडून निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 04:44 PM2018-07-11T16:44:28+5:302018-07-11T16:50:31+5:30

देवगड तालुक्यातील तांबळडेग समुद्रकिनारी एका मच्छिमाराला बेवारस स्थितीत सिलिंडर आढळल्याने खळबळ उडाली. मात्र, चौकशीअंती मिळालेला रिकाम्या स्थितीतील सिलिंडर नौकेवर कुलींगसाठी वापरण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. बॉम्बशोधक-नाशक पथकाने हा सिलिंडर निकामी केला.

Sindhudurg: A secluded seamless cylinders found, detained by a bomb disposal squad | सिंधुदुर्ग : समुद्रकिनारी बेवारस सिलिंडर आढळला, बॉम्बशोधक पथकाकडून निकामी

तांबळडेग येथील समुद्र किनाऱ्यावर मच्छिमाराला बेवारस स्थितीतील सिलिंडर आढळला.

googlenewsNext
ठळक मुद्देसमुद्रकिनारी बेवारस सिलिंडर आढळला, तांबळडेग येथील घटना बॉम्बशोधक पथकाकडून निकामी

सिंधुदुर्ग : देवगड तालुक्यातील तांबळडेग समुद्रकिनारी एका मच्छिमाराला बेवारस स्थितीत सिलिंडर आढळल्याने खळबळ उडाली. मात्र, चौकशीअंती मिळालेला रिकाम्या स्थितीतील सिलिंडर नौकेवर कुलींगसाठी वापरण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. बॉम्बशोधक-नाशक पथकाने हा सिलिंडर निकामी केला.

देवगड तालुक्यातील तांबळडेग समुद्रकिनारी संतोष राघोबा कोयंडे या मच्छिमाराला रविवारी सायंकाळी ५.३० वाजण्याचा सुमारास बेवारस स्थितीत सिलिंडर आढळला. त्यांनी याबाबत देवगड पोलीस स्टेशनला कळविल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक जी. व्ही. वारंग, सागर पोलीस दलाचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र साळुंखे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण, मधुकर पानसरे, शैलेश कांबळे, दादा परब आदींनी घटनास्थळी जाऊन सिलिंडर ताब्यात घेतला.

तो निकामी करण्यासाठी सिंधुदुर्ग बॉम्बशोधक-नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. मंगळवारी सायंकाळी या पथकाने देवगड येथे निर्जनस्थळी हा सिलिंडर निकामी केला. या पथकामध्ये एस. पी. साटम, व्ही. व्ही. वरवडेकर, एल. आर. तवटे, एस. एन. शिंदे, एम. ए. घाडीगावकर, पी. पी. दळवी, श्वान लकी आदी सहभागी होते.

तांबळडेग येथे मिळालेला सिलिंडर हा तपासाअंती बोटींवर कुलींगसाठी वापरण्यात येणारा सिलिंडर असल्याचे निष्पन्न झाले असून बोटीवर एकदा वापरून झाल्यानंतर तो समुद्रातील पाण्यात फेकल्याने गंजला होता.
मे महिन्यात मळई खाडीकिनारीही अशाच पध्दतीचा सिलिंडर सापडला होता.

सर्वसाधारण पावसाळा सुरू होण्यापूर्वी व पावसाळ्यात समुद्रात अशाप्रकारच्या बेवारस वस्तू आढळत असून मच्छिमारांनीही अशा वस्तू आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

Web Title: Sindhudurg: A secluded seamless cylinders found, detained by a bomb disposal squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.