सिंधुदुर्ग : ऋतिका पालकरची दिल्लीत चित्रकला प्रदर्शनासाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 01:17 PM2018-08-13T13:17:41+5:302018-08-13T13:21:15+5:30

आंतरराष्ट्रीय चित्रकार, शिल्पकार व रांगोळीकार एस. बी. पोलाजी यांच्या स्वामी समर्थ जीवन विकास संस्थेच्यावतीने कोकण व गोवा राज्यांतील कलाकारांचे पंधरावे रांगोळी आणि सातवे चित्रकला प्रदर्शन नवी दिल्ली येथे ९ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. या प्रदर्शनासाठी माणगाव येथील ऋतिका विजय पालकर हिची निवड झाली आहे.

Sindhudurg: Ritika Palkar's selection in Delhi for painting exhibition | सिंधुदुर्ग : ऋतिका पालकरची दिल्लीत चित्रकला प्रदर्शनासाठी निवड

सिंधुदुर्ग : ऋतिका पालकरची दिल्लीत चित्रकला प्रदर्शनासाठी निवड

Next
ठळक मुद्देऋतिका पालकरची दिल्लीत चित्रकला प्रदर्शनासाठी निवड९ ते २५ नोव्हेंबरला आयोजन : कोकण, गोव्यातील कलाकारांचा समावेश

माणगाव : आंतरराष्ट्रीय चित्रकार, शिल्पकार व रांगोळीकार एस. बी. पोलाजी यांच्या स्वामी समर्थ जीवन विकास संस्थेच्यावतीने कोकण व गोवा राज्यांतील कलाकारांचे पंधरावे रांगोळी आणि सातवे चित्रकला प्रदर्शन नवी दिल्ली येथे ९ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. या प्रदर्शनासाठी माणगाव येथील ऋतिका विजय पालकर हिची निवड झाली आहे.


ऋतिकाने साकारलेली आकर्षक चित्रे.

चित्रकार पोलाजी यांनी चौदा वर्षे सिंधुदुर्ग व गोवा राज्यात रांगोळी प्रदर्शन व स्पर्धा तसेच सावंतवाडी येथील आर्ट गॅलरीत सहा वर्षे चित्रकला प्रदर्शन भरविले. दिल्ली येथील प्रदर्शनास सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कलाकारांना आपल्या कलाकृतींसह पोलाजी यांच्या बांदा-वाफोली येथील घरी बोलविण्यात आले होते. यावेळी ऋतिकाने बनविलेल्या कलाकृती पाहून भारावून गेल्याचे पोलाजी यांनी सांगितले.


ऋतिकाने साकारलेली आकर्षक चित्रे.
 

ऋतिकाने तयार केलेली चित्रे नैसर्गिक वस्तूंपासून बनविल्याने तिची या प्रदर्शनात निवड झाली आहे. माणगाव येथील प्रसिध्द काष्ठशिल्पकार विजय पालकर यांची ती कन्या असून, तिच्या निवडीबाबत सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Web Title: Sindhudurg: Ritika Palkar's selection in Delhi for painting exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.