सिंधुदुर्ग : भावी पिढीला वाचनाची आवड लावण्याची गरज :अनंत वैद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 04:06 PM2018-03-06T16:06:52+5:302018-03-06T16:06:52+5:30

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व नट वाचनालय बांदा आयोजित ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन येथील नट वाचनालयाच्या संत सोहिरोबानाथ नगरीत झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरून अनंत वैद्य बोलत होते. अधिवेशनाचे उद्घाटन माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते झाले.

Sindhudurg: The need of pre-reading the future generation: Anant Vaidya | सिंधुदुर्ग : भावी पिढीला वाचनाची आवड लावण्याची गरज :अनंत वैद्य

बांदा येथे जिल्हा ग्रंथालय संघाच्या अधिवेशनाचे उद्घाटन प्रमोद कामत यांच्या हस्ते झाले. यावेळी रणजित देसाई, मंदार कल्याणकर, अनंत वैद्य, श्वेता कोरगावकर, शीतल राऊळ उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देबांदा येथे जिल्हा ग्रंथालय अधिवेशननट वाचनालयाच्या सदस्यांचा सत्कार वाचनालयाचे प्रश्न मंत्री, अधिकाऱ्यांशी बोलून मार्गी लावणार

बांदा : धावत्या युगात युवा पिढीही वेगवान झाली आहे. पुस्तके वाचण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. किंबहुना त्यांचा वाचनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निरस झाला आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून देत वाचनाची गोडी लावणे गरजेचे आहे. शिक्षक, शाळा आणि ग्रंथालये यांनी यात पुढाकार घेत भावी पिढीला वाचनाची आवड लावली तरच ही वाचन संस्कृती टिकून राहील, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनंत वैद्य यांनी बांदा येथे केले.

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व नट वाचनालय बांदा आयोजित ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन येथील नट वाचनालयाच्या संत सोहिरोबानाथ नगरीत झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरून अनंत वैद्य बोलत होते. अधिवेशनाचे उद्घाटन माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते झाले.

आशुतोष भांगले यानी संत सोहिरोबानाथ अंबिये यांचे पद गाऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, बांदा सरपंच मंदार कल्याणकर, मानसोपचार तज्ज्ञ तथा साहित्यिक डॉ. रुपेश पाटकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले, कार्यवाह मंगेश मसके, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, पंचायत समिती सदस्य शीतल राऊळ, कुडाळच्या नगरसेविका उषा आठल्ये, बांदा व्यापारी संघाचे सचिव सचिन नाटेकर, नट वाचनालयाचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर आदी उपस्थित होते. सकाळी ९ वाजता बांदा शहरातून ग्रंथदिंडी काढून या अधिवेशनाची सुरुवात झाली.

अनंत वैद्य पुढे म्हणाले, आजच्या शिक्षण क्षेत्रात केवळ पुस्तकी ज्ञान दिले जाते. शिक्षणाचे धडे देणाºयांनीही इतिहासाची पाने चाळली असतील असे दिसून येत आहे. त्यामुळे या भावी पिढीला वाचनासाठी प्रवृत्त करणार कोण हा एक प्रश्नच आहे अशी खंत व्यक्त केली. वाचनालय किंवा ग्रंथालये चालविताना सर्वांचे सहकार्य आवश्यक असून शिक्षण क्षेत्रातही या वाचनाचा प्रसार होणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

माजी सभापती प्रमोद कामत म्हणाले, पुस्तके मानवी जीवनाला दिशा देण्याचे काम करत असल्याने वाचनालय हे जीवनात महत्त्वाचे आहे. त्यामुळे वाचनालय बंद न पडता ते अखंडित चालू रहावे यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी प्रमोद कामत, रणजित देसाई, मंदार कल्याणकर, श्रेया गोखले, श्वेता कोरगावकर, डॉ. रुपेश पाटकर, शीतल राऊळ, सचिन नाटेकर, उषा आठल्ये यांच्यासह अधिवेशनाचे योग्य नियोजन करणाऱ्या नट वाचनालयाच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय प्रकाश तेंडोलकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन चंद्रकांत सावंत यांनी तर आभार प्रकाश तेंडोलकर यांनी मानले. यावेळी वाचनालयाचे सहकार्यवाह मनोज मालवणकर, उपाध्यक्ष राजेंद्र केसरकर, संचालक एस. आर. सावंत, सुभाष मोरये, शंकर नार्वेकर, निलेश मोरजकर, उर्मिला जोशी उपस्थित होते.

वाचनालयाचे प्रश्न मंत्री, अधिकाऱ्यांशी बोलून मार्गी लावणार

जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई म्हणाले, जिल्ह्यातील विविध वाचनालये आदर्शवत काम करीत असून आम्हांला या वाचनालयांचा अभिमान आहे. वाचनालयांचे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. बांदा सरपंच मंदार कल्याणकर यांनीही नट वाचनालय हे बांदा गावचे शिरोमणी आहे.

या वाचनालयाच्या कार्याचा गौरव करावा तितका थोडाच आहे. या वाचनालयाचे काही प्रश्न आहेत ते आम्ही शिक्षणमंत्री आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून मार्गी लावू असेही त्यांनी आश्वासन दिले.

 

Web Title: Sindhudurg: The need of pre-reading the future generation: Anant Vaidya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.