सिंधुदुर्ग : महामार्ग चौपदरीकरण : कुडाळ बंदची बचाव समितीने दिली हाक; आंदोलनाचाही ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 04:30 PM2018-07-03T16:30:35+5:302018-07-03T16:34:10+5:30

महामार्ग चौपदरीकरणाचा कुडाळ शहराच्या विकासावर भविष्यात होणारा विपरीत परिणाम लक्षात घेत कुडाळवासीयांनी एकत्र येऊन कुडाळ बचाव समितीची स्थापना केली आहे. कुडाळ शहरातून चौपदरीकरणाचे कुडाळवासीयांना अपेक्षित काम न झाल्यास कुडाळ बंदची हाक देऊन आंदोलन करण्याचा ठराव यावेळी एकमताने घेण्यात आला.

Sindhudurg: Highway four-lane: Kudal Bandi Rescue Committee gave its call; Resolution of the Movement | सिंधुदुर्ग : महामार्ग चौपदरीकरण : कुडाळ बंदची बचाव समितीने दिली हाक; आंदोलनाचाही ठराव

सिंधुदुर्ग : महामार्ग चौपदरीकरण : कुडाळ बंदची बचाव समितीने दिली हाक; आंदोलनाचाही ठराव

Next
ठळक मुद्देमहामार्ग चौपदरीकरण : कुडाळ बंदची बचाव समितीने दिली हाककुडाळ बंद करण्याचा ठराव

सिंधुदुर्ग : महामार्ग चौपदरीकरणाचा कुडाळ शहराच्या विकासावर भविष्यात होणारा विपरीत परिणाम लक्षात घेत कुडाळवासीयांनी एकत्र येऊन कुडाळ बचाव समितीची स्थापना केली आहे. कुडाळ शहरातून चौपदरीकरणाचे कुडाळवासीयांना अपेक्षित काम न झाल्यास कुडाळ बंदची हाक देऊन आंदोलन करण्याचा ठराव यावेळी एकमताने घेण्यात आला.

कुडाळ शहराच्या महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असताना कुडाळ शहराच्या भविष्यातील विकासाच्या संदर्भातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कुडाळ शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी श्री देव कुडाळेश्वर मंदिर येथे सोमवारी सायंकाळी एकत्र येत बैठक घेतली.

या बैठकीला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, संजय पडते, अ‍ॅड. राजीव बिले, केदार सामंत, बनी नाडकर्णी, संतोष शिरसाट, देवानंद काळप, बाळा वेंगुर्लेकर, संदेश पडते, प्रसाद शिरसाट, गजानन कांदळगावकर, राजन बोभाटे, प्रज्ञा राणे, संजय बांदेकर, संजय पिंगुळकर, सुरेश राऊळ, सुभाष सावंत, भाई गिरकर, आत्माराम जाधव, प्रसाद गावडे तसेच शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते.

बैठकीत कुडाळ शहरातील विविध समस्या सोडविण्याबाबत आवाज उठविण्यासाठी कुडाळ बचाव समितीची स्थापना सर्वानुमते करण्यात आली. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात कुडाळ शहरातून बॉक्सवेल करण्यात येत असून, त्यामुळे कुडाळच्या विकासावर दीर्घकालीन परिणाम होणार आहे. त्यामुळे याबाबत आवाज उठविण्याची गरज व्यक्त करण्यात आली. त्यानुसार येथील बॉक्सवेलला विरोध करण्याचे ठरले.

तसेच या संदर्भात गुरूवारी सकाळी कुडाळ येथील श्री देव पाटेश्वर मंदिर येथे बैठक आणि त्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन यावर निर्णय न झाल्यास कुडाळ बंद करण्याचा ठराव घेण्यात आला.

Web Title: Sindhudurg: Highway four-lane: Kudal Bandi Rescue Committee gave its call; Resolution of the Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.