सिंधुदुर्ग : कोळपे भुसारवाडी येथील संरक्षक भिंत ढासळली, चार महिन्यांपूर्वीच केले बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 02:16 PM2018-06-26T14:16:47+5:302018-06-26T14:18:20+5:30

कोळपे भुसारवाडी येथील सार्वजनिक विहिरीनजीक यावर्षी ओहोळाला बांधलेली संरक्षक भिंत पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ढासळली आहे. १४ व्या वित्त आयोगातून या कामावर १ लाख ४९ हजार रुपये खर्च झाले असून चार महिन्यांपूर्वीच हे काम करण्यात आले होते.

Sindhudurg: Constructor wall collapse in Kolse Bhusarwadi, constructed four months ago | सिंधुदुर्ग : कोळपे भुसारवाडी येथील संरक्षक भिंत ढासळली, चार महिन्यांपूर्वीच केले बांधकाम

सिंधुदुर्ग : कोळपे भुसारवाडी येथील संरक्षक भिंत ढासळली, चार महिन्यांपूर्वीच केले बांधकाम

Next
ठळक मुद्देकोळपे भुसारवाडी येथील संरक्षक भिंत ढासळलीचार महिन्यांपूर्वीच केले बांधकामचौदाव्या वित्त आयोगातून दीड लाख खर्च

वैभववाडी : कोळपे भुसारवाडी येथील सार्वजनिक विहिरीनजीक यावर्षी ओहोळाला बांधलेली संरक्षक भिंत पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ढासळली आहे. १४ व्या वित्त आयोगातून या कामावर १ लाख ४९ हजार रुपये खर्च झाले असून चार महिन्यांपूर्वीच हे काम करण्यात आले होते.

भुसारवाडी येथील सार्वजनिक विहिरीसमोरील ओहोळाच्या प्रवाहामुळे लगतच्या शेतजमिनीची धूप होऊन भविष्यात विहिरीला धोका उद्भवू शकतो. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ओहोळाला जानेवारी अखेरीस संरक्षक भिंत बांधण्यात आली.

या कामाचा मक्ता तालुक्यातील एका मजूर संस्थेने घेतला होता. या कामाचा जोखीम कालावधी संपण्याआधीच संरक्षक भिंत ढासळली आहे. निकृष्ट काम झाल्यामुळेच ही संरक्षक भिंत ढासळली असल्याचा गंभीर आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.

मक्तेदाराला ग्रामपंचायतीची नोटीस

संरक्षक भिंतीच्या कामाचा जोखीम कालावधी सहा महिन्यांचा असून तो संपलेला नाही. त्यामुळे संरक्षक भिंत ढासळल्याने मक्तेदार मजूर संस्थेला ग्रामपंचायतीने नोटीस काढली आहे. त्यांनी ढासळलेल्या संरक्षक भिंतीची पुनर्बांधणी करून देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे मक्तेदाराकडून संरक्षक भिंतीचे पुन्हा काम करून घेतले जाईल, असे ग्रामसेवक ए. जे. कांबळे यांनी सांगितले.

सखोल चौकशी करून कारवाईची मागणी

पावसाळ्यात ओहोळाच्या पाण्याचा मोठा प्रवाह असतो. हे माहीत असूनही संरक्षक भिंतीचे काम सुरू असताना ग्रामपंचायत किंवा बांधकामच्या अधिकाऱ्यांनी कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष केल्याचे ढासळलेल्या भिंतीमुळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून या प्रकाराची सखोल चौकशी करून जबाबदार लोकांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
 

Web Title: Sindhudurg: Constructor wall collapse in Kolse Bhusarwadi, constructed four months ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.