सिंधुदुर्ग : कॉंग्रेसने कार्यकारी अभियंत्यांचे रस्त्याच्या दुर्दशेकडे वेधले लक्ष, काम न झाल्यास तीव्र आंदोलन, निवेदनादवारे दिला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 05:18 PM2018-01-17T17:18:00+5:302018-01-17T17:26:23+5:30

कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौक ते आचऱ्यापर्यन्त जाणाऱ्या राज्यमार्गाची पूर्ण चाळण झाली आहे. हा रस्ता लवकरात लवकर सुस्थितीत न आणल्यास रास्ता रोको तसेच अधिकाऱ्यांना घेराव असे आंदोलनात्मक पर्याय अवलंबले जातील. असा इशारा निवेदनाद्वारे कणकवली तालुका कॉंग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर यांना मंगळवारी कार्यालयात भेट घेवून दिला.

Sindhudurg: Congress urges the working engineers to pay attention to the road accident, acute movement if not done, give notice | सिंधुदुर्ग : कॉंग्रेसने कार्यकारी अभियंत्यांचे रस्त्याच्या दुर्दशेकडे वेधले लक्ष, काम न झाल्यास तीव्र आंदोलन, निवेदनादवारे दिला इशारा

कणकवली आचरा रस्त्यासंदर्भात प्रदीप व्हटकर यांना काँग्रेसच्यावतीने निवेदन देण्यात आले . यावेळी महेंद्र सावंत, आतिष जेठे , विलास कोरगावकर , निखिल गोवेकर , विशाल हर्णे , लीलाधर बांदेकर आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देकॉंग्रेसने कार्यकारी अभियंत्यांचे रस्त्याच्या दुर्दशेकडे वेधले लक्षकाम न झाल्यास तीव्र आंदोलननिवेदनादवारे दिला इशारा

कणकवली : कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौक ते आचऱ्यापर्यन्त जाणाऱ्या राज्यमार्गाची पूर्ण चाळण झाली आहे . हा रस्ता लवकरात लवकर सुस्थितीत न आणल्यास रास्ता रोको तसेच अधिकाऱ्यांना घेराव असे आंदोलनात्मक पर्याय अवलंबले जातील. असा इशारा निवेदनाद्वारे कणकवली तालुका कॉंग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर यांना मंगळवारी कार्यालयात भेट घेवून दिला.

या निवेदनात म्हंटले आहे कि , कणकवली आचारा रस्त्याबाबत या भागातील राजकीय पक्षांनी आपल्या परीने निवेदने देवून तसेच आंदोलने करून रस्त्याची सद्यस्थिती निदर्शनास आणून दिली. काँग्रेसने हि वृक्षारोपण सारखे आंदोलन छेडले . त्यावेळी आपल्याकडून रस्ता सुस्थितीत आणण्याचे आश्वासन देण्यात आले होते . मात्र मलमपट्टी वगळता दुरुस्तीबाबत आपल्याकडून काहीच हालचाल केली गेलेली नाही.

 या रस्त्यावरील उखडलेल्या खडीमुळे अनेक अपघात होत आहेत . यातच चार दिवसापूर्वी एक महिला याच रस्त्यावरून चालत असताना बाजूने जाणाऱ्या डंपरच्या टायर खाली दगड येऊन तो त्या पादचारी महिलेच्या पायावर बसून ती जायबंद झाली आहे.

कणकवली आचरा रस्त्यासंदर्भात प्रदीप व्हटकर यांना काँग्रेसच्यावतीने निवेदन देण्यात आले . यावेळी महेंद्र सावंत, आतिष जेठे , विलास कोरगावकर , निखिल गोवेकर , विशाल हर्णे , लीलाधर बांदेकर आदी उपस्थित होते.

यामुळे संबधित रस्ता त्वरित दुरुस्त करणार कि अपघात व जखमी प्रवासी पहात बसणार असा सवाल या निवेदनातून करण्यात आला आहे. हा रस्ता लवकर सुस्थितीत न आल्यास आंदोलन करण्यात येणार असून यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी त्याला आपणच जबाबदार असाल. असेहि या निवेदनात म्हंटले आहे.

यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने रस्ता सुस्थितीत करण्याचे लेखी पत्र देण्याची मागणी प्रदीप व्हटकर यांच्याकडे केली.जोपर्यंत लेखी आश्वसन मिळत नाहि, तोपर्यंत येथून हलणार नाही असा पवित्रा या शिष्टमंडळाने घेतला.

त्यानंतर व्हटकर यांनी या रस्त्यासंदर्भात १९ जानेवारीला निविदा उघडण्यात येणार आहे. तदनंतर आवश्यक ती प्रक्रीया होऊन पात्र मक्तेदारास कामाचे आदेश लवकरात लवकर देण्याची कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले.

यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सावंत ,उपतालुकाध्यक्ष आतिष जेठे ,शहराध्यक्ष विलास कोरगावकर , निखिल गोवेकर, विशाल हर्णे , लीलाधर बांदेकर , प्रवीण वरुणकर ,चंद्रकांत पवार , दिव्या साळगावकर , शिंदे,  महेश कोदे , निलेश मालंडकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .


 

Web Title: Sindhudurg: Congress urges the working engineers to pay attention to the road accident, acute movement if not done, give notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.