सिंधुदुर्गात काँग्रेसकडून सेना-भाजपाला धोबीपछाड  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 03:59 AM2017-09-14T03:59:49+5:302017-09-14T04:00:30+5:30

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा असतानाच जिल्हा नियोजन समिती सदस्य पदासाठीच्या दोन जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांनी भाजपा-शिवसेनेला धोबीपछाड दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 In Sindhudurg, the Congress-Force-BJP wash-up | सिंधुदुर्गात काँग्रेसकडून सेना-भाजपाला धोबीपछाड  

सिंधुदुर्गात काँग्रेसकडून सेना-भाजपाला धोबीपछाड  

Next

सिंधुदुर्गनगरी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा असतानाच जिल्हा नियोजन समिती सदस्य
पदासाठीच्या दोन जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांनी भाजपा-शिवसेनेला धोबीपछाड दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
२४ जागांपैकी काँग्रेसला १५, भाजपाला ३ तर सेनेला ६ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला सर्वाधिक १५ जागा मिळाल्याने सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर काँग्रेसचे वर्चस्व राहणार आहे.
नगर परिषद मतदारसंघातून काँग्रेसच्या राजू बेग यांनी शिवसेनेच्या शुभांगी सुकी यांचा ६ मतांनी पराभव केला. बेग यांना २९ तर सुकी यांना २३ मते मिळाली. तर नगरपंचायत मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या संध्या तेरसे यांनी भाजपाच्या उषा आठल्ये यांचाही ६ मतांनी पराभव केला.
जिल्हा नियोजन समिती सदस्य निवड प्रक्रियेमध्ये २२ जागांवर शिवसेना, काँग्रेस व भाजपा या पक्षांकडून यशस्वी शिष्टाई झाल्याने या जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर दोन जागांवर वरील तिन्ही पक्षांच्या उमेदवारांकडून समझोता न झाल्याने अखेर प्रशासनास निवडणूक घेणे भाग पडले होते.

Web Title:  In Sindhudurg, the Congress-Force-BJP wash-up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.