सिंधुदुर्ग : भाजपावर टिका करणाऱ्या राणेंची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार :प्रमोद जठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 03:24 PM2018-12-19T15:24:26+5:302018-12-19T15:26:14+5:30

भाजपाच्या तिकिटावर खासदार झालेल्या नारायण राणेंनी सातत्याने केंद्र आणि राज्य शासनाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोंदीवर टिका करण्याचे धोरण अवलंबले आहे. या संदर्भात भाजपाच्या प्रभारी सरोजीनी पांडे यांच्याकडे पक्षात राहून राणे टिका करत असल्याची तक्रार आपण केली आहे. तसेच राणेंना सन्मानाने राजीनामा द्यायला सांगा अन्यथा त्यांना पक्षातून काढून टाका अशी मागणीही भाजप कोकण विभाग आढावा बैठकीत केली असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे दिली.

Sindhudurg: Complaint against BJP's Ranchi candidate: Pramod Jathar | सिंधुदुर्ग : भाजपावर टिका करणाऱ्या राणेंची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार :प्रमोद जठार

सिंधुदुर्ग : भाजपावर टिका करणाऱ्या राणेंची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार :प्रमोद जठार

Next
ठळक मुद्देभाजपावर टिका करणाऱ्या राणेंची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार प्रमोद जठार यांची माहिती

कणकवली : भाजपाच्या तिकिटावर खासदार झालेल्या नारायण राणेंनी सातत्याने केंद्र आणि राज्य शासनाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोंदीवर टिका करण्याचे धोरण अवलंबले आहे. या संदर्भात भाजपाच्या प्रभारी सरोजीनी पांडे यांच्याकडे पक्षात राहून राणे टिका करत असल्याची तक्रार आपण केली आहे. तसेच राणेंना सन्मानाने राजीनामा द्यायला सांगा अन्यथा त्यांना पक्षातून काढून टाका अशी मागणीही भाजप कोकण विभाग आढावा बैठकीत केली असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे दिली.

कणकवली येथील भाजपा जिल्हा संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा चिटणीस रविंद्र शेटये उपस्थित होते.

यावेळी प्रमोद जठार म्हणाले, नारायण राणे यांनी भाजपाची खासदारकी घेऊन पक्षावर टिका करणे हे नैतिकतेला धरून नाही. आमच्या पक्षाच्या चिन्हावर खासदार होतात आणि आमच्यावरच टिका करतात. हे योग्य नव्हे. खरोखरच त्याना स्वाभिमान असेल तर त्यानी खासदारकीचा सन्मानाने राजीनामा द्यावा . त्यानंतर बेलाशक टिका करावी .

नाणार रिफायनरी प्रकल्पाला ज्यांचा आता विरोध आहे . त्यांनीच तेथील जमिनी विकल्याचे आता समोर येत आहे. शिवसेना आणि स्वाभिमानचेच कार्यकर्ते या जमिनी विक्री व्यवहारात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे भविष्यात हे विरोध करणारेच पुन्हा प्रकल्पाच्या बाजूने उभे रहातील अशी स्थिती आहे. नाणार प्रकल्प नको म्हणणारे बेरोजगार तरूणांच्या जिवाशी खेळत आहेत. असा आरोप प्रमोद जठार यांनी यावेळी केला.

शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानाने बाजूला करा !

छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते. त्यामुळे राजकीय मतभेद न करता सध्या महामार्गाचे काम सुरू असल्याने कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनाने सन्मानाने बाजूला करून ताब्यात घेतला पाहिजे. सध्या प्लास्टिकची पिशवी बांधून शिवाजी महाराजांना ठेवण्यात आले आहे.

या पुतळ्याची विटंबणा किंवा ठेकेदारकडून महामार्गाचे काम करत असताना चुकून नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून पुन्हा वादाची ठिणगी पडू शकते. त्यामुळे महसुल प्रशासन, महामार्ग प्राधिकरण, पोलीस विभागाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने हा पुतळा सुस्थितीत काढून ठेवला पाहिजे. जागा निश्चितीनंतर शिवाजी महाराज यांचा पुतळा सन्मानाने पुन्हा उभा करण्यात यावा .असे प्रमोद जठार यांनी यावेळी सांगितले.

20 डिसेंबरला जिल्हा महोत्सव !

महाराष्ट्रात सीएम चषकाच्या माध्यमातून 50 लाख तरूण तरूणी क्रीडा महोत्सवात सहभागी झाले आहेत. सिंधुदुर्गात विविध 14 प्रकारच्या स्पर्धांमध्ये 82 हजार 238 तरूण-तरूणींनी सहभाग घेतला आहे. तालुकास्तरीय फेरी पुर्ण झाल्यानंतर आता जिल्हास्तरावरील महोत्सवाचे उद्घाटन 20 डिसेंबर रोजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ओरोस येथे होणार आहे. 500 दुचाकींच्या रॅलीने या स्पर्धेचा शुभारंभ होईल. तर समारोप क्रीडा व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत होईल. सीएम चषक स्पर्धेमुळे भाजपा कार्यकर्त्यांमधील मरगळ कमी झाली असून भविष्यात संघटनात्मक बांधणीसाठी त्यामुळे मदत होणार आहे.असे प्रमोद जठार यांनी सांगितले.

जिल्हा कार्यकारिणीत ठराव घेऊ !

नारायण राणे टिका प्रकरणी राज्य प्रभारी सरोजीनी पांडे यांनी भाजप राष्ट्रीय अध्यक्षांशी चर्चा करण्याचे आश्वासन आपल्याला दिले आहे. या पुढील काळात राणेंनी टिका सुरूच ठेवल्यास जिल्हा कार्यकारिणीत त्यांना पक्षातून काढून टाकण्याचा ठराव घेऊन राष्ट्रीय अध्यक्षांकडे पाठविणार असल्याचेही प्रमोद जठार यावेळी म्हणाले.

Web Title: Sindhudurg: Complaint against BJP's Ranchi candidate: Pramod Jathar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.