सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला वेंगुर्लेत कचरा डेपोमध्ये भोजनाचा आस्वाद, स्वच्छतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 05:42 PM2018-01-13T17:42:56+5:302018-01-13T17:46:54+5:30

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज वेंगुर्ले कचरा डेपोला भेट दिली. येथील स्वच्छते बाबत विविध प्रकल्पाची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. ज्या ठिकाणी पूर्वी दुर्घंधिने नाक दाबावे लागे त्याच ठिकाणी आज जिल्हाधिकाऱ्यांनी जेवणाचा उपक्रमांचे कौतुक करत आस्वाद घेतला.

Sindhudurg collector took lunch in Vengurle garbage depot, praised the cleanliness of the district collectors | सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला वेंगुर्लेत कचरा डेपोमध्ये भोजनाचा आस्वाद, स्वच्छतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक

सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला वेंगुर्लेत कचरा डेपोमध्ये भोजनाचा आस्वाद, स्वच्छतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक

Next
ठळक मुद्देचक्क कचरा डेपोमध्ये जेवणाचा आस्वाद घेतलास्वच्छतेबाबत राबवित असलेल्या उपक्रमांचे केले जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज वेंगुर्ले कचरा डेपोला भेट दिली. येथील स्वच्छते बाबत विविध प्रकल्पाची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. ज्या ठिकाणी पूर्वी दुर्घंधिने नाक दाबावे लागे त्याच ठिकाणी आज जिल्हाधिकाऱ्यांनी जेवणाचा उपक्रमांचे कौतुक करत आस्वाद घेतला.

वेंगुर्लेत कचऱ्याचे वर्गीकरण केल्यामुळे स्वच्छ भारत पर्यटन स्थळ होत आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क कचरा डेपोमध्ये जेवणाचा आस्वाद घेतला. शहरवासीय स्वच्छतेबाबत राबवित असलेल्या उपक्रमांचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले.

१२ हजार लोकसंख्या असलेल्या वेंगुर्ले शहरावर देशाचे लक्ष असून शहरात स्वच्छ सर्वेक्षण घडामोडीत लक्षणीय वाढ होत आहे. जिल्ह्यात स्वच्छतेच्या बाबतीत  वेंगुर्ले नेहमीच  आघाडीवर असून ज्या पद्धतीने वेंगुर्ले नगरपरिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिक एकत्र येवून काम करत आहेत. त्यामुळे विकासाबरोबर स्वच्छ्ता अभियानात प्रथम क्रमांक मिळविला हेच सातत्य कायम राहिल्यास देशातही अव्वल ठरू शकतो असे उदगार जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी काढले.

वेंगुर्ले नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात स्वच्छ्तेचा वेंगुर्ले  पॅटन चित्रफित दाखवण्यात आली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध गोष्टीचा आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले कोकणी माणूस सुरुवातीला कोणतीही गोष्ट आचरणात आणतो व नंतरच कृतीत करतो. सचिन तेंडुलकर हा एकच असतो त्याच्या प्रमानेच आपण स्वच्छतेत एकच नंबर असलो पाहिजे.

विकास कामासाठी निधीची कमतरता नसून चांगल्या कामासाठी शासनाकडून निधी नेहमीच मिळतो.आपण काम जास्त करतो पण त्याचे कागदोपत्री सादरीकरण कमी दाखवतो. आपण वेंगुर्ले नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षणाचा आढावा घेण्यासाठी आलो असल्याचे सांगितले.

      स्वच्छ सर्वेक्षण आढावा २०१८कार्यक्रमाला सकाळी स्वच्छता फेरीने सुरुवात झाली. या फेरीत जिल्हाधिकारी उदय चौधरी,  जिल्हा प्रशासक संतोष  जिरगे,  नगराध्यक्ष राजन गिरप तहसीलदार शरद गोसावी मुख्याधिकारी वैभव साबळे सह उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक सुहास गवंडळकर, प्रशांत आपटे , प्रकाश डिचोलकर, तुषार सापळे,धर्मराज कांबळी, संदेश निकम,नागेश गावडे,शैलेश गावडे, सुमन निकम, पूनम जाधव, कृपा गिरप, स्नेहा खोबरेकर, कृतिका कुबल, शितल आंगचेकर, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, नगरपरिषद प्रशासक अधिकारी ,कर्मचारी ,शाळांचे शिक्षक व विद्यार्थी  मोठ्या संख्येने झाले होते.
 

 

Web Title: Sindhudurg collector took lunch in Vengurle garbage depot, praised the cleanliness of the district collectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.