सिंधुदुर्ग : एसटीच्या को-आॅपरेटीव्ह बँकेत संचालकांचा अनागोंदी कारभार : गीतेश कडू यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 05:09 PM2018-09-14T17:09:32+5:302018-09-14T17:14:24+5:30

एसटी को-आॅपरेटीव्ह बँकेच्या संचालकांच्या अनागोंदी कारभारामुळे सर्वसामान्य कर्मचारी त्रस्त झाले असल्याचा आरोप विभागीय महराष्ट्र एसटी कामगार सेना सचिव गीतेश कडू यांनी केला आहे़.

Sindhudurg: The chaos of the directors in the co-operative bank of ST: charge of Geetesh Kadu | सिंधुदुर्ग : एसटीच्या को-आॅपरेटीव्ह बँकेत संचालकांचा अनागोंदी कारभार : गीतेश कडू यांचा आरोप

सिंधुदुर्ग : एसटीच्या को-आॅपरेटीव्ह बँकेत संचालकांचा अनागोंदी कारभार : गीतेश कडू यांचा आरोप

ठळक मुद्देएसटीच्या को-आॅपरेटीव्ह बँकेत संचालकांचा अनागोंदी कारभारगीतेश कडू यांचा आरोप: एसटीच्या को-आॅपरेटीव्ह बँकेतील प्रकार

सिंधुदुर्ग : एसटी को-आॅपरेटीव्ह बँकेवर मान्यताप्राप्त संघटनेचे संचालक मंडळ सत्तेवर आहेत. या बँकेचे ९० हजार कर्मचारी सभासद आहेत. मात्र संचालकांच्या अनागोंदी कारभारामुळे सर्वसामान्य कर्मचारी त्रस्त झाले आहेत.

१०० टक्के वसुली असतानादेखील कर्मचाऱ्यांना माफक व्याजदरात कर्ज उपलब्ध होत नाही़. गतवेळच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलकडून कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करण्याची घोषणा फसवी ठरल्याचा आरोप विभागीय महराष्ट्र एसटी कामगार सेना सचिव गीतेश कडू यांनी केला आहे़.

एसटी को-आॅपरेटीव्ह बँकेत १३ टक्के व्याजदर आकारले जात आहे़. कामगाराच्या हक्काचा, कष्टाचा, घामाचा लाभांश १० सप्टेंबर २०१८ रोजी मिळणे आवश्यक असताना सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे तो मिळू शकला नाही़.

एसटी बँक ही कायदेशीर सल्लागारांसाठी लाखो रुपये खर्च करत आहे़. मग त्रुटी का राहतात हा प्रश्न सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना पडला आहे़. कोल्हापूर या बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत लोकांना पोहोचण्या अगोदरच ही सभा काही मिनीटात समाप्त करण्यात आली़. हा बँकेचा कारभार संशयास्पद असल्याचा दावा, गीतेश कडू यांनी केला.

या एसटी बँकेत घाणेरड्या पध्दतीने राजकीयदृष्ट्या व्देषाने काम सुरू आहे़. कर्मचाऱ्यांच्या हिताला फाटा देऊन कामकाज केले जाते़. सर्वसाधारण वार्षिक सभा ५० शाखांमधील सभासदांची असते़. मात्र ही सभा मान्यताप्राप्त संघटनेचे संचालक अवघ्या काही मिनीटात संपवितात. त्यामागे संशय निर्माण करण्यासारखे चित्र आहे़ कर्मचारी हा अत्यंत हालाखिच्या परिस्थितीत आहे़.

या बँकेचे कर्ज बुडविल्याचा प्रकार आतापर्यंत नाही़ या बँकेची १०० टक्के वसुली असताना देखील कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात नसल्याचे, गीतेश कडू यांनी दिलेल्या म्हटले आहे़.

Web Title: Sindhudurg: The chaos of the directors in the co-operative bank of ST: charge of Geetesh Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.