सिंधुदुर्ग : भुईबावडा-जांभवडे मार्गावर जांभवडेत मोरीला भगदाड, अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 04:26 PM2018-06-18T16:26:47+5:302018-06-18T16:26:47+5:30

भुईबावडा-जांभवडे मार्गावर जांभवडे रहाटेकोंडवाडी नजीकच्या मोरीला भगदाड पडले आहे. त्याठिकाणी अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, जिल्हा परिषद बांधकामने भगदाडाकडे दुर्लक्ष केले आहे.

Sindhudurg: Bhimbabda-Jambhhedi road leads to Jambhavadita Morrea breakup, possibility of accidents | सिंधुदुर्ग : भुईबावडा-जांभवडे मार्गावर जांभवडेत मोरीला भगदाड, अपघाताची शक्यता

जांभवडे येथे मोरीला पडलेल्या भगदाडाकडे जिल्हा परिषद बांधकामने दुर्लक्ष केल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.

Next
ठळक मुद्देभुईबावडा-जांभवडे मार्गावर जांभवडेत मोरीला भगदाड, अपघाताची शक्यता  जिल्हा परिषद बांधकामचे दुर्लक्ष; तत्काळ दुरूस्तीची मागणी

वैभववाडी : भुईबावडा-जांभवडे मार्गावर जांभवडे रहाटेकोंडवाडी नजीकच्या मोरीला भगदाड पडले आहे. त्याठिकाणी अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, जिल्हा परिषद बांधकामने भगदाडाकडे दुर्लक्ष केले आहे.

भुईबावडा-जांभवडे मार्गावरील या मोरीला बऱ्याच दिवसांपासून हे भगदाड पडल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जाते. मात्र, जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून भगदाडाची दुरुस्ती न करता भोवताली दगड ठेवण्याव्यतिरिक्त कोणतेही पाऊल उचलले गेलेले नाही.

या मार्गावर एसटीसह अन्य वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी भगदाड पडलेल्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. या भगदाडाची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी जांभवडे ग्रामस्थ व वाहनचालकांतून केली जात आहे.

विश्रांतीनंतर वैभववाडीत पावसाला सुरुवात

वैभववाडी तालुक्यात रविवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरु झाली आहे. रविवारी १0 रोजी दुपारपासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर आता शनिवारी रात्री तसेच रविवारी सकाळी पावसाच्या सरी बरसल्या. या पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाला आहे. हा पाऊस शेतीसाठी समाधानकारक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Sindhudurg: Bhimbabda-Jambhhedi road leads to Jambhavadita Morrea breakup, possibility of accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.