सिंधुदुर्ग : मारहाण प्रकरणातील आरोपींना अटक करा..सार्वजनिक बांधकाम विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:21 PM2018-12-14T12:21:05+5:302018-12-14T12:25:19+5:30

खारेपाटण येथे कार्यकारी अभियंता प्रदीप सदाशिव व्हटकर यांना तेथील काही स्थानिक लोकप्रतिनीधी व जमावाने केलेल्या मारहाणीचा सिंधुदुर्ग जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचारी संघटनेने जाहीर निषेध करत दिवसभर काळ्याफिती लावून काम केले.

Sindhudurg: The arrest of the accused in the murder case ... Public Works Department | सिंधुदुर्ग : मारहाण प्रकरणातील आरोपींना अटक करा..सार्वजनिक बांधकाम विभाग

सिंधुदुर्ग : मारहाण प्रकरणातील आरोपींना अटक करा..सार्वजनिक बांधकाम विभाग

googlenewsNext
ठळक मुद्देमारहाण प्रकरणातील आरोपींना अटक करा..सार्वजनिक बांधकाम विभागजिल्हाधिकारी व अपर पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर

सिंधुदुर्ग : खारेपाटण येथे कार्यकारी अभियंता प्रदीप सदाशिव व्हटकर यांना तेथील काही स्थानिक लोकप्रतिनीधी व जमावाने केलेल्या मारहाणीचा सिंधुदुर्ग जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचारी संघटनेने जाहीर निषेध करत दिवसभर काळ्याफिती लावून काम केले.

व्हटकर यांना मारहाण करणारे संशयित हे राजकीय पक्षांशी निगडीत कार्यकर्ते आहेत. त्यामुळे कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता सर्व संशयित आरोपींना तत्काळ अटक करा अशी मागणी संघटनेने जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे व अतिरिक्त पोलीस अधीक्षक निमीत गोयल यांच्याकडे भेट घेऊन केली.

कणकवली विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर व चालक यांना ११ डिसेंबर रोजी खारेपाटण येथे काही जणांनी मारहाण केली होती. या मारहाणीचा पहिल्यांदा चालक संघटनेच्यावतीने तदनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी जाहीर निषेध करून अटकेच्या कारवाईची मागणी केली आहे.

यावेळी कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर, युवराज देसाई, किसन घाडगे, ए.के.निकम, ए.डी.आवटी, पी. जी. तावडे, एस. पी. हिवाळे, के. के. प्रभू, अनामिका जाधव,अशोक दांडगे, गौरव ढेवले, विलास परब, सुभाष गोंधळी, एस. एन.बागवे यांच्यासह संघटनेच्या ५० जणांनी बुधवारी जिल्हाधिकारी व अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

सिंधुदुर्ग जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी व कर्मचारी संघटनेने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खारेपाटण येथे एका रस्त्यावर कोसळले झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी गेलेल्या कार्यकारी अभियंता व्हटकर यांना तेथील स्थानिक लोकप्रतिनीधी व जमावाने मारहाण केली. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर क्षेत्रिय अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मालवणमध्ये शाखा अभियंता यांनाही काही महिन्यांपूर्वी मारहाण झाली होती. यामुळे जिल्ह्यातील अधिकारी कर्मचा-यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

व्हटकर यांना मारहाण करणा-या सर्व संशयितांना तत्काळ अटक करून अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे व अपर पोलीस अधीक्षक निमीत गोयल यांच्याकडे भेट घेऊन केली आहे. दरम्यान बुधवार दिवसभर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी काळ्याफिती लावून काम करत निषेध नोंदविला.

उर्वरित संशयितांना लवकरच अटक करू - गोयल

अभियंता व्हटकर यांना मारहाण करणाऱ्या संशयितांना अटक करा अशी मागणी संघटने केली असता, अपर पोलीस अधीक्षक निमीत गोयल यांनी आपण उर्वरित संशयितांना लवकरच अटक करू असे आश्वासन दिल्याचे संघटनेच्या अधिकारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
 

Web Title: Sindhudurg: The arrest of the accused in the murder case ... Public Works Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.