सिंधुदुर्ग : अनधिकृतरित्या मासेमारी, सत्ताधारी, अधिकारी यांच्यात साटेलोटे, नौका पळवून लावल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 11:37 AM2018-11-15T11:37:50+5:302018-11-15T11:40:15+5:30

अनधिकृतरित्या मासेमारी करताना पकडलेली नौका पळून जाण्याची तिसरी घटना मालवणात घडली आहे. सत्ताधारी व अधिकारी यांच्यात साटेलोटे असल्यानेच रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत या नौका पळवून लावल्या जात आहेत. हे मोठे रॅकेट असून नौका पळविण्यामागे शिवसेना पदाधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी केला.

Sindhudurg: Accused of ferrying, boats, officers and officials | सिंधुदुर्ग : अनधिकृतरित्या मासेमारी, सत्ताधारी, अधिकारी यांच्यात साटेलोटे, नौका पळवून लावल्याचा आरोप

सिंधुदुर्ग : अनधिकृतरित्या मासेमारी, सत्ताधारी, अधिकारी यांच्यात साटेलोटे, नौका पळवून लावल्याचा आरोप

Next
ठळक मुद्दे अनधिकृतरित्या मासेमारी, सत्ताधारी, अधिकारी यांच्यात साटेलोटे नौका पळवून लावल्याचा आरोप

सिंधुदुर्ग : अनधिकृतरित्या मासेमारी करताना पकडलेली नौका पळून जाण्याची तिसरी घटना मालवणात घडली आहे. सत्ताधारी व अधिकारी यांच्यात साटेलोटे असल्यानेच रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत या नौका पळवून लावल्या जात आहेत. हे मोठे रॅकेट असून नौका पळविण्यामागे शिवसेना पदाधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी केला.

मालवण धुरीवाडा येथे पत्रकार परिषद झाली. ते म्हणाले, जिल्ह्याच्या सागरी हद्दीत अनधिकृतरित्या मासेमारी करताना आतापर्यंत पकडलेल्या नौकांपैकी काही नौका रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत पळून गेल्या. येथील बंदरात घडलेली ही तिसरी घटना आहे.

सत्ताधारी, मत्स्य व्यवसायचे अधिकारी यांच्यात साटेलोटे असल्याने तेच नौका पळवून नेण्यासाठी संबंधितांना रात्रीची मदत करीत आहेत. कारण अनोळखी नौका येथील बंदरातून रात्रीच्यावेळी बाहेर पडणे शक्य नाही. त्यामुळे नौका पळवून नेण्यासाठी कोण मदत करतात हे शोधायला हवे.

नौका पकडल्यापासून पोलीस ठाणे, मत्स्य व्यवसाय कार्यालय असे काही पदाधिकारी सातत्याने थांबले असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांचे थांबणे संशयास्पद आहे.

Web Title: Sindhudurg: Accused of ferrying, boats, officers and officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.