सिंधुदुर्ग : कणकवलीचा नगराध्यक्ष १२ हजार ५२५ मतदार निवडणार, नगरपंचायत निवडणूक रणसंग्राम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 03:27 PM2018-03-07T15:27:27+5:302018-03-07T15:27:27+5:30

कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर झाली असून अंतिम मतदार यादीही निश्चित करण्यात आली आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडायचा आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादीनुसार १२ हजार ५२५ मतदार कणकवलीचा नगराध्यक्ष निवडणार आहेत.

Sindhudurg: 12 thousand 525 voters will be elected as municipal president of Kankavli, Nagar Panchayat elections | सिंधुदुर्ग : कणकवलीचा नगराध्यक्ष १२ हजार ५२५ मतदार निवडणार, नगरपंचायत निवडणूक रणसंग्राम सुरू

सिंधुदुर्ग : कणकवलीचा नगराध्यक्ष १२ हजार ५२५ मतदार निवडणार, नगरपंचायत निवडणूक रणसंग्राम सुरू

Next
ठळक मुद्देकणकवलीचा नगराध्यक्ष १२ हजार ५२५ मतदार निवडणारनगरपंचायत निवडणूक रणसंग्राम सुरूअंतिम मतदार यादी प्रसिद्ध

सुधीर राणे 

कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर झाली असून अंतिम मतदार यादीही निश्चित करण्यात आली आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडायचा आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादीनुसार १२ हजार ५२५ मतदार कणकवलीचा नगराध्यक्ष निवडणार आहेत.

या नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्याही वाढली असून या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. तर या निवडणुकीच्या अनुषंगाने कणकवली शहरात रणसंग्राम सुरु झाला आहे. एकमेकांवर राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सध्या झडत आहेत.

या निवडणुकीसाठी शहरात १७ प्रभाग करण्यात आले असून १७ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. कणकवली नगरपंचायतीची प्रभाग रचना ही सन २०११ च्या जनगनणेत असलेल्या १६ हजार ३९८ या लोकसंख्येनुसार करण्यात आली आहे. प्रभाग छोटे झाल्यामुळे निवडून येताना उमेदवारांची खºया अर्थाने कसोटी लागणार आहे.

आता आचारसंहिता जाहीर झाल्याने निवडणूक प्रचाराला वेग येणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी बाहेरगावी असणाऱ्या मतदारांचा शोध घेणे सुरु केले आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे तसेच गाव विकास आघाडी ही निवडणूक लढविणार आहेत.

काही अपक्ष उमेदवारांनीही तयारी सुरु केली आहे. त्यामुळे या निवडणुकीची रंगत वाढणार आहे. आगामी काळात कोणकोणते पक्ष आघाडी अथवा युती करून निवडणूक लढवितात हेही तितकेच औत्सुक्याचे असून त्याबाबत कणकवली शहरात सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

प्रभागनिहाय मतदार संख्या

प्रभाग १ : पुरुष ४९५, स्त्री ४८५ (एकूण ९८०), प्रभाग २:पुरुष २२०, स्त्री २१७ (एकूण ४३७), प्रभाग ३ : पुरुष ३७१, स्त्री ३५३ (एकूण ७२४), प्रभाग ४: पुरुष २७६,स्त्री ३०६(एकूण ५८२), प्रभाग ५-पुरुष ३०६, स्त्री ३३९ (एकूण ६४५), प्रभाग ६ : पुरुष ३७२, स्त्री ३८२ (एकूण ७५४),

प्रभाग ७ : पुरुष ५१९, स्त्री ५६० (एकूण १०७९), प्रभाग ८- पुरुष ३३२ , स्त्री ३७१ (एकूण ७०३), प्रभाग ९: पुरुष ४०४, स्त्री ४१७ (एकूण ८२१), प्रभाग १० : पुरुष ३७९, स्त्री ३३० (एकूण ७०९), प्रभाग ११ : पुरुष ३३५, स्त्री ३३९ (एकूण ६७४), प्रभाग १२ : पुरुष ४०१ , स्त्री ३८६ (एकूण ७८७)

प्रभाग १३ : पुरुष ३९३ , स्त्री ४२५ (एकूण ८१८), प्रभाग १४: पुरुष ४३३ , स्त्री ४२९ (एकूण ८६२), प्रभाग १५ : पुरुष २९७, स्त्री २८६ (एकूण ५८३), प्रभाग १६ : पुरुष ३१६, स्त्री ३०६ (एकूण ६२२), प्रभाग १७ : पुरुष ३७५, स्त्री ३७० (एकूण ७४५) असे मतदार आहेत.

१७ मतदान केंद्रांवर होणार मतदान !

जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मध्ये दोन मतदान केंद्रे असणार आहेत. यामध्ये प्रभाग १० व प्रभाग ११ च्या मतदारांचा समावेश आहे. जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ मध्ये प्रभाग १ , प्रभाग २ व प्रभाग ३, जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ मध्ये प्रभाग ७, प्रभाग ८ व प्रभाग ९ च्या मतदारांचा समावेश आहे. जिल्हा परिषद शाळा क्रमांक ४ मध्ये प्रभाग १२ व प्रभाग १३ , जिल्हा परिषद शाळा क्रमांक ५ मध्ये प्रभाग १५, प्रभाग १६ व प्रभाग १७ च्या मतदारांचा समावेश आहे.

विद्यामंदिर हायस्कूलमध्ये प्रभाग ४, प्रभाग ५, प्रभाग ६ व प्रभाग १४ मधील मतदाराना मतदान करता येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रात दोन ईव्हीएम मशीन असणार आहेत. मतदारांनी एका ईव्हीएम मशीनवर नगराध्यक्ष तर दुसऱ्या ईव्हीएम मशीनवर नगरसेवक निवडण्यासाठी मतदान करायचे आहे.

Web Title: Sindhudurg: 12 thousand 525 voters will be elected as municipal president of Kankavli, Nagar Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.