ठळक मुद्देसिंधुदुर्ग किनारपट्टीवरील सागरी सुरक्षेचा आढावा मालवण, देवगड, वेंगुर्ले किनारपट्टी तालुक्यात मोहीम राबविणार रेड टीमचे कवच भेदण्यासाठी ब्ल्यू टीम सज्ज

मालवण ,दि. ८ : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर भागात ८ ते ९ नोव्हेंबर या कालवधीत पोलीस प्रशासनाच्या वतीने सागर सुरक्षा कवच मोहीम राबविण्यात येणार आहे. सागरी सुरक्षेचा आढावा घेण्याच्या दृष्टीने पुढील ३६ तासासाठी किनारपट्टी सील करण्यात आली आहे.

बुधवार ८ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ९ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ३६ तास ही मोहीम चालणार आहे. पोलीस प्रशासनाच्या रेड व ब्ल्यू टीम मोहिमेत सहभागी होणार असून रेड टीमचे कवच भेदण्यासाठी ब्ल्यू टीम सज्ज झाली आहे.


मालवण व आचरा किनारपट्टीवर राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत पाच अधिकाऱ्यांसह ६४ पोलीस कर्मचारी सहभागी होणार आहेत. मालवण किनारपट्टीवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तोंडवळी, आचरा किनारपट्टीवर टेहाळणी मनोरे, समुद्रात दोन स्पीडबोट अशी सुरक्षा कवच मोहीम राबविली जाणार आहे.

प्रमुख रस्ते मार्गावरही नाकाबंदी केली जाणार असून वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार मालवण पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जाणार आहे.


सागरी सुरक्षेचा आढावा

सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील मालवण, देवगड व वेंगुर्ले या किनारपट्टी तालुक्यात प्रामुख्याने ही मोहीम राबविली जाणार आहे. तर किनारपट्टीवरील सर्व पोलीस स्थानके सहभागी होणार आहेत. पोलिसांच्याच रेड टीममधून दहशतवादी वेशात चोरीछुपे पोलीस किनारपट्टीवरील रेड टीमचे सुरक्षा कवच भेदण्याचा प्रयत्न करणार असून यातून सुरक्षेचा आढावा घेतला जाणार आहे. याचा अहवालही वरिष्ठांना द्यावा लागतो. त्यामुळे या मोहिमेला महत्त्व असते.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.