शाळकरी मुलांनी केली चैनीसाठी घरफोडी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 03:22 PM2019-03-26T15:22:07+5:302019-03-26T15:25:34+5:30

कणकवली शहरात शाळकरी मुलांनी चैनीसाठी घरफोडी केल्याचे उघड झाले आहे. कणकवली पोलिसांनी घरफोडी गुन्ह्यात शहरातील तीन शाळकरी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांना बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही घरफोडीची घटना ५ मार्च रोजी घडली होती.

School children scandal exploded! | शाळकरी मुलांनी केली चैनीसाठी घरफोडी !

शाळकरी मुलांनी केली चैनीसाठी घरफोडी !

Next
ठळक मुद्दे मुलांनी चैनीसाठी घरफोडी केल्याचे उघड !कणकवली शहरातील अल्पवयीन बाल न्यायालयात

कणकवली : कणकवली शहरात शाळकरी मुलांनी चैनीसाठी घरफोडी केल्याचे उघड झाले आहे. कणकवली पोलिसांनी घरफोडी गुन्ह्यात शहरातील तीन शाळकरी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांना बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही घरफोडीची घटना ५ मार्च रोजी घडली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, कणकवली तहसील कार्यालयाजवळील चाळीत दिलीप मालवणकर हे रहातात. त्यांचे घर फोडून ५ मार्च रोजी रोख ३९ हजार रुपये अज्ञात चोरट्यानी लंपास केले होते. मालवणकर आपल्या कुटुंबीयांसह महाशिवरात्रीला भुदरगड येथे गावी गेले असताना घराचा मागील दरवाजा फोडून चोरट्यानी ही चोरी केली होती.

मालवणकर यांच्या घरातील लोखंडी कपाट, पर्स आणि पाउचमधील रोख ३९ हजारांच्या रक्कमेवर डल्ला मारण्यात आला होता. गावावरून कणकवली येथे परतल्यावर मालवणकर यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे समजले होते. त्यामुळे त्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. तसेच पोलीस तपासा दरम्यान घराशेजारीलच मुलांनी चोरी केल्याचा संशय मालवणकर यांनी व्यक्त केला होता.

त्यानुसार पोलीस तपास करीत होते. अधिक तपास करताना नववी आणि दहावीत शिकणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांवर तपास केंद्रित करण्यात आला. त्या तिन्ही संशयितांना २५ मार्च रोजी दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिक चौकशी केल्यावर त्या तिघा मुलांनी आपण चोरी केल्याचे कबूल केले. त्यानंतर त्यांच्या पालकांना त्याबाबत कल्पना देण्यात आली. तसेच अधिक चौकशीनंतर रात्री पालकांकडे त्यांना सुपूर्द करण्यात आले.

कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजवर्धन खेबुडे यांनी वाहतूक पोलीस नाईक प्रकाश गवस ,चालक उबाळे यांच्या सहाय्याने हा यशस्वी तपास करण्यात आला. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, हवालदार बाळू कांबळे यांनीही या तपासात सहकार्य केले. त्या अल्पवयीन मुलांकडून चोरीतील पैशांपैकी ३६ हजार ३५ रुपये परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर तिन्ही अल्पवयीन आरोपीना बालन्यायालयात हजार करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याआधीसुद्धा त्या तिन्ही शाळकरी मुलांनी मालवणकर यांच्या घरात हातसफाई करत रोख रक्कम चोरल्याचे उघड होत आहे. मात्र याबाबत मालवणकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही. या घटनेमुळे कणकवली शहरात खळबळ उडाली आहे.

Web Title: School children scandal exploded!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.