स्वाभिमानच्या महिला पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ : पोलीस उपनिरीक्षकांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:56 PM2019-05-13T12:56:08+5:302019-05-13T13:01:16+5:30

महाराष्ट्र स्वाभिमानच्या दोन महिला पदाधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून सातत्याने अश्लील भाषेत शिवीगाळ व गैरवर्तन करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल होऊन दोन दिवस उलटले तरी अद्याप संशयितास पकडण्यात अपयश आल्याच्या निषेधार्थ पक्षाच्यावतीने शुक्रवारी पोलीस उपनिरीक्षक सुजित घाटगे यांना घेराव घालण्यात आला.

Scavenging women's office bearers of self-respect: Police subdivision surrounded | स्वाभिमानच्या महिला पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ : पोलीस उपनिरीक्षकांना घेराव

महाराष्ट्र स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सुजित घाटगे यांना घेराव घालून जाब विचारला.

Next
ठळक मुद्देस्वाभिमानच्या महिला पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ : संशयितांना पकडण्यात अपयशपोलीस उपनिरीक्षकांना घेराव

दोडामार्ग : महाराष्ट्र स्वाभिमानच्या दोन महिला पदाधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून सातत्याने अश्लील भाषेत शिवीगाळ व गैरवर्तन करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल होऊन दोन दिवस उलटले तरी अद्याप संशयितास पकडण्यात अपयश आल्याच्या निषेधार्थ पक्षाच्यावतीने शुक्रवारी पोलीस उपनिरीक्षक सुजित घाटगे यांना घेराव घालण्यात आला.

राजकीय दबाव असल्याने पोलीस संशयितास पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी तालुकाध्यक्ष संतोष नानचे यांनी केला. तसेच जोपर्यंत आरोपीस अटक होत नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्यातून जाणार नसल्याचा इशारा दिला.
महाराष्ट्र स्वाभिमानच्या तालुक्यातील दोन महिला पदाधिकाऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून भ्रमणध्वनीवरून अज्ञाताकडून अश्लील भाषेत शिवीगाळ केली जात असल्याचा प्रकार घडला.

याबाबत दोन्ही पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला. पण गुन्हा दाखल होऊन दोन दिवस उलटले तरी संशयिताच्या मुसक्या आवळण्यात अपयश आल्याने स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर धडक दिली. यावेळी तालुकाध्यक्ष संतोष नानचे, उपजिल्हाध्यक्ष शैलेश दळवी, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, शिक्षण व आरोग्य सभापती अनिषा दळवी, कल्पना बुडकुले, शिवाजी गवस आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

गृहराज्यमंत्री यांच्या मतदार संघात ही परिस्थिती असेल तर पोलीस यंत्रणेवर विश्वास ठेवावा तरी कसा? असा सवाल यावेळी नानचे यांनी उपस्थित केला. यावेळी संशयिताचे लोकेशन भेडशी येथे मिळाले असून, तो वापरत असलेले सिमकार्ड छत्तीसगड येथील परप्रांतियाच्या नावावर नोंदणीकृत आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक घाटगे यांनी दिली. तसेच सीडीआर मिळाल्यावर लगेच कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र, नानचे यांनी तुम्हाला एवढी माहिती मिळून सुद्धा अद्याप आरोपीस अटक का होत नाही, असा सवाल उपस्थित करीत पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव असल्याचा आरोप केला. जोपर्यंत आरोपीस अटक होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. अखेर आरोपीला अटक करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर घेराव मागे घेण्यात आला.
 

Web Title: Scavenging women's office bearers of self-respect: Police subdivision surrounded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.