रेडी परिसरात भात कापणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 03:29 PM2017-10-17T15:29:40+5:302017-10-17T15:36:18+5:30

रेडी परिसरात भात कापणीच्या कामाने वेग घेतला आहे. कापणीचे काम लवकरात लवकर आटोपण्यासाठी शेतकरीवर्ग प्रयत्नशील आहे. अचानक येणाऱ्या पावसाच्या भीतीमुळे तयार झालेले भात लवकरात लवकर कापून ते घरात घेण्याच्या प्रयत्नात बळीराजा दिसत आहे

Rice garnish in red area | रेडी परिसरात भात कापणीला वेग

रेडी परिसरात भात कापणीला वेग

Next
ठळक मुद्देकापणीचे काम लवकर आटोपण्यासाठी शेतकरीवर्ग प्रयत्नशील पावसामुळे शेतकऱ्याच्या मनात भीती कायम

रेडी , दि. १७ :  रेडी परिसरात भात कापणीच्या कामाने वेग घेतला आहे. कापणीचे काम लवकरात लवकर आटोपण्यासाठी शेतकरीवर्ग प्रयत्नशील आहे. अचानक येणाऱ्या पावसाच्या भीतीमुळे तयार झालेले भात लवकरात लवकर कापून ते घरात घेण्याच्या प्रयत्नात बळीराजा दिसत आहे.


गणेशोत्सवादरम्यान पडलेला पाऊस शेतीसाठी अधिक लाभदायी ठरला. सद्यस्थितीत शिवारात भातपीक बहरून आले आहे. रेडीसह आरोंदा, शिरोडा, तिरोडा, तळवणे परिसरात सध्या भात कापणीच्या कामाला जोर आला आहे.

कापणीबरोबरच मळणी, भात मारणी, झोडणी आदी कामांना वेग आला आहे. मात्र अचानक येणाऱ्या पावसाच्या सरींमुळे कामात व्यत्यय येत आहे.


सध्या भातकापणीसाठी पोषक वातावरण असले, तरी रात्रीच्यावेळी आणि दिवसाही अचानक पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्याच्या मनात भीती कायम आहे. त्यामुळे कापणी केलेले पीक लवकरात लवकर घरी आणण्यासाठी शेतकऱ्याची हातघाई सुरू आहे.

Web Title: Rice garnish in red area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.