...तर राज ठाकरे पुन्हा करणार नाणार परिसराचा दौरा - नितीन सरदेसाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 05:44 PM2018-04-20T17:44:47+5:302018-04-20T17:57:23+5:30

नाणार प्रकल्पाला विरोध असला तर तो प्रकल्प गुजरात जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणणे म्हणजे दुर्दैव आहे. देशात एवढी राज्ये असताना मुख्यमंत्र्यांना गुजरातच का दिसते, असा सवाल मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी केला. राज ठाकरे यांनी एकदा नाणारला भेट दिलीच आहे. पण गरज पडल्यास आणखी एकदा भेट देतील, असेही यावेळी सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

Raj Thackeray will again visit Nanar : Nitin Sardesai | ...तर राज ठाकरे पुन्हा करणार नाणार परिसराचा दौरा - नितीन सरदेसाई

...तर राज ठाकरे पुन्हा करणार नाणार परिसराचा दौरा - नितीन सरदेसाई

Next

- अनंत जाधव
सावंतवाडी - नाणार प्रकल्पाला विरोध असला तर तो प्रकल्प गुजरात जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणणे म्हणजे दुर्दैव आहे. देशात एवढी राज्ये असताना मुख्यमंत्र्यांना गुजरातच का दिसते, असा सवाल मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी केला. राज ठाकरे यांनी एकदा नाणारला भेट दिलीच आहे. पण गरज पडल्यास आणखी एकदा भेट देतील, असेही यावेळी सरदेसाई यांनी स्पष्ट केले.
मनसे नेते नितीन सरदेसाई हे शुक्रवारी पदाधिकाºयांच्या बैठकीसाठी सावंतवाडीत आले होते. त्यावेळी त्यांनी लोकमतशी संवाद साधला. 
यावेळी कामगार नेते मनोज चव्हाण, कोकणचे संपर्क नेते शिरिष सावंत, माजी नगरसेविका स्रेहल जाधव, जिल्हाध्यक्ष धीरज परब, राजन दाभोलकर, तालुकाप्रमुख गुरू गवडे, चैताली भेंडे आदी उपस्थित होते.
मनसेचे नेते सरदेसाई म्हणाले, आम्ही सर्वजण सध्या संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करीत आहोत. मी स्वत: पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत प्रत्येक तालुक्यात जाऊन पदाधिका-यांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. या संपूर्ण दौ-याचा अहवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुपूर्द करणार असून, पक्ष संघटनेत फेरबदल करायचे का? याचा सर्वस्वी निर्णय राज ठाकरे घेणार आहेत. या बैठकीत आम्ही फक्त पदाधिका-यांचे म्हणणे ऐकून घेतले. कोणतीही भाषणबाजी केली नाही, असेही सरदेसाई यांनी सांगितले.


मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चार वर्षापूर्वी सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान गायले होते. मग आता काय झाले, यावर सरदेसाई म्हणाले, गुजरातमधील विकास आम्ही बघितला होता. तो बरा वाटला. मोदी देशात काही तरी चांगले करतील, असे वाटत होते. पण मागील चार वर्षात आमचाच नव्हे, तर देशाचा पूर्ण भ्रमनिरास झाला आहे. सर्व उद्योग गुजरातमध्ये नेण्याचे काम सुरू आहे. त्याला आमचा विरोध आहे. मोदी गुजरातचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहेत. तसे त्यांनी काम करणे गरजेचे असल्याचे मतही यावेळी सरदेसाई यांनी व्यक्त केले.
नाणार प्रकल्पाला विरोध आहे. तो यापूर्वीच पक्षाध्यक्षांनी जाहीर केला आहे. त्यानंतर मुंबईत त्याची प्रतिकियाही उमटली. त्यामुळे नाणार होणार नाही. पण मुख्यमंत्री नाणारला विरोध असल्यास प्रकल्प गुजरातला जाईल, असे सांगत आहेत. त्यांना देशातील इतर राज्ये का दिसत नाहीत? गुजरातच का दिसते? असा सवाल सरदेसाई यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी गुजरातवरच प्रेम करू नये, असा सल्लाही यावेळी सरदेसाई यांनी दिला. तसेच यापूर्वी नाणारला राज ठाकरे येऊन गेले आहेत. मुंबईतही प्रकल्पग्रस्त भेटले. पण गरज पडल्यास पुन्हा एकदा राज ठाकरे नाणारमध्ये येतील, असेही यावेळी सरदेसाई यांनी स्पष्ट केले.
 
महाराष्ट्र स्वाभिमानशी युतीचा निर्णय पक्षाध्यक्ष घेतील
स्थानिक निवडणुकीत कोणाशी युती करायची याचा अधिकार हा स्थानिक पातळीवर घेतला जातो. तसा निर्णय पिंगुळीतील निवडणुकीबाबत घेण्यात आला. याचा अर्थ सर्वच निवडणुकीत मनसे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाशी युती करेल असे नाही. मात्र याचे सर्व निर्णय पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे घेत असतात. मोठ्या निवडणुकीत काय करायचे ते पक्षप्रमुखच ठरवतील, असे यावेळी मनसे नेते सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

Web Title: Raj Thackeray will again visit Nanar : Nitin Sardesai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.