सिंधुदुर्गात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 06:42 PM2017-12-08T18:42:53+5:302017-12-08T18:52:36+5:30

मार्च 2018 पर्यंत देशात 251 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार असून महाराष्ट्रात सिंधुदुर्गसह 16 केंद्र लवकरच सुरू करण्यात येतील अशी माहिती विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली आहे.

Passport Seva Kendra will be started in Sindhudurg | सिंधुदुर्गात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार

सिंधुदुर्गात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार

Next
ठळक मुद्देदेशात 251 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार : ज्ञानेश्वर मुळे सिंधुदुर्गसह महाराष्ट्रात 16 नवीन पासपोर्ट कार्यालये

सिंधुदुर्ग : मार्च 2018 पर्यंत देशात 251 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार असून महाराष्ट्रात सिंधुदुर्गसह 16 केंद्र लवकरच सुरू करण्यात येतील अशी माहिती विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली आहे.


देशातील नागरिकांना सुलभ पासपोर्ट सेवा मिळावी या उद्देशाने नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून येत्या मार्च 2018 पर्यंत देशात 251 केंद्र सुरू होणार आहेत .

यापैकी महाराष्ट्रात 20 पासपोर्ट केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, यातील 4 पासपोर्ट केंद्र सोलापूर, औरंगाबाद, कोल्हापूर व पिंपरी चिंचवड येथे सुरू करण्यात आली आहेत.उर्वरित 16 पासपोर्ट केंद्र लवकरच कार्यान्वित होतील अशी माहिती ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली आहे.

ही असतील 16 नवीन पासपोर्ट कार्यालये

महाराष्ट्रात जी नवीन 16 पासपोर्ट कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत यामध्ये सिंधुदुर्गसह वर्धा, जालना, लातूर, अहमदनगर, पंढरपूर, सांगली, बीड, मुंबई नॉर्थ सेन्ट्रल, मुंबई साऊथ सेंट्रल, घाटकोपर, नवी मुंबई, डोंबिवली, पनवेल, नांदेड व जळगाव या जिल्यांचा समावेश आहे. या 16 नवीन पासपोर्ट केंद्रामुळे राज्यात पासपोर्ट केंद्रांची संख्या 27 होणार आहे.

Web Title: Passport Seva Kendra will be started in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.