भात पिक खरेदीसाठी शासनाकडून आॅगस्टमध्ये अध्यादेश : रवींद्र चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 01:54 PM2019-07-11T13:54:47+5:302019-07-11T14:03:00+5:30

कुडाळ : ठेकेदारांनी योग्य वेळेत चांगले व त्यांच्या कामाची यशोगाथा वर्षानवर्षे टिकून राहील, असे काम केल्यास विकासकामांना दिलेला निधी ...

Ordinance from Government to buy rice crop in August: Ravindra Chavan | भात पिक खरेदीसाठी शासनाकडून आॅगस्टमध्ये अध्यादेश : रवींद्र चव्हाण

भात पिक खरेदीसाठी शासनाकडून आॅगस्टमध्ये अध्यादेश : रवींद्र चव्हाण

Next
ठळक मुद्देभात पिक खरेदीसाठी शासनाकडून आॅगस्टमध्ये अध्यादेश : रवींद्र चव्हाणवर्षानुवर्षे प्रतिक्षेत असलेल्या तेंडोली-भोम पुलाचे उद्घाटन

कुडाळ : ठेकेदारांनी योग्य वेळेत चांगले व त्यांच्या कामाची यशोगाथा वर्षानवर्षे टिकून राहील, असे काम केल्यास विकासकामांना दिलेला निधी कधीच वाया जाणार नाही, असे प्रतिपादन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तेंडोली-भोम पुलाच्या शुभारंभी प्रसंगी केले. शेतकऱ्यांच्या भात पिकाची खरेदी योग्य वेळेत होण्यासाठी या संदर्भातील अध्यादेश शासनाकडून आॅगस्ट महिन्यातच काढण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

कुडाळ तालुक्यातील गेले अनेक वर्षे मागणी असलेल्या तेंडोली-भोम पुलाचा शुभारंभ राज्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, सभापती राजन जाधव, जिल्हा परिषद सदस्या वर्षा कुडाळकर, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, पंचायत समिती सदस्या अनघा तेंडोलकर, तेंडोली सरपंच मंगेश प्रभू, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता अनामिका जाधव, भाजपाचे भाई सावंत, महेश सारंग, राजू राऊळ, नीलेश तेंडुलकर, अतुल बंगे, विजय प्रभू, संजय वेंगुर्लेकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

तेंडोलीचा पाणी प्रश्न सोडविणार : वैभव नाईक

युती सरकारच्याच काळात मोठ्या प्रमाणात विकासकामे मंजूर झाली आहेत. राज्याचे बांधकाममंत्री चंद्र्रकांत पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून रखडलेले रस्ते, पूल व साकवांच्या कामांना गती मिळाली असून, लवकरच ही कामे पूर्ण होतील, असे आमदार वैभव नाईक म्हणाले. तेंडोली येथील पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात येणार आहे. येथील शेती व बागायतींना योग्य प्रकारे पाणीपुरवठा होण्याकरिता विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी दिली.

भात पिकाबाबत जनजागृती करा

आॅगस्टमध्येच भातपीक खरेदीचा शासन निर्णय निघेल. मात्र, तोपर्यंत शेतकऱ्यांनी भातपीक खरेदी केंद्र्रावर नेण्याकरिता तसेच भात पिकाला सरकारकडून मिळणाऱ्या चांगल्या दराबाबत व जास्तीत जास्त भात पीक पिकविण्याबाबत सर्वांनी गावोगावी जनजागृती करावी, असे आवाहन राज्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी केले.
 

Web Title: Ordinance from Government to buy rice crop in August: Ravindra Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.