सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी १२ भरारी पथक, २२ तपासणी नाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:00 PM2019-03-14T12:00:18+5:302019-03-14T12:06:00+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह््यात एकही उपद्रवी मतदान केंद्र नाही. गुन्हेगारी प्रवृत्ती असणारे ४३ जण हद्दपारीच्या रडारवर असून सध्यस्थितीत १९जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्याकडे सादर केले आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी दिली.

In order to keep an eye on illegal activities in Sindhudurg district, 12 pilots, 22 check posts | सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी १२ भरारी पथक, २२ तपासणी नाके

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी १२ भरारी पथक, २२ तपासणी नाके

ठळक मुद्देअवैध हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी १२ भरारी पथक, २२ तपासणी नाकेगेडाम यांची माहिती : ४३ जण हद्दपारीच्या रडारवर, १९ जणांचे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे

सिंधुदुर्गनगरी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. अवैध हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी बारा भरारी पथक व २२ तपासणी नाके स्थापना करण्यात आले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी जिल्ह्यात १८५४ अतिरिक्त पोलीस बळाची व चार सीआरपीएफ दलाची आवश्यकता लागणार आहे. जिल्ह््यात एकही उपद्रवी मतदान केंद्र नाही. गुन्हेगारी प्रवृत्ती असणारे ४३ जण हद्दपारीच्या रडारवर असून सध्यस्थितीत १९जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्याकडे सादर केले आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी दिली.

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम म्हणाले, लोकसभा निवडणुक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस दल सज्ज झाले आहे. याच धर्तीवर जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या परंतु साक्ष देण्यास पोलीस ठाण्यात न येणाऱ्या सहा जणांना अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तर २0३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीला सामोरे जात असताना जिल्ह्याला आणखीन १८५४ पोलिसांची तर २३६ होमगार्डची मदत लागणार आहे. त्याअनुषगाने आपण एवढ्या पोलीस बळाची मागणी केली असल्याची माहिती गेडाम यांनी दिली. आचारसंहिता लागू झाल्या नंतर सर्व मतदार केंद्रांना भेटी देऊन सुरक्षिततेच्यादृष्टीने पाहणी केली आहे. मागील निवडणुकांचा इतिहास पाहता जिल्ह्यात एकही मतदान केंद्र उपद्रवी नाही.

निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या १८जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव प्रांताधिकारी यांना सादर करण्यात आले आहेत. प्रांताधिकारी यांनी संबंधित प्रस्तावांवर सही केल्यानंतर या गुन्हेगारांना एका विशिष्ट कालावधी साठी जिल्ह्यातून हद्दपार केले जाणार आहेत. तर आणखीन २३ जण हद्दपारी साठी आमच्या रडारवर आहेत. ही संख्या पन्नास पर्यंत वाढू शकते असेही गेडाम यांनी सांगितले.

१२ भरारी पथकांची स्थापना

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १२ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तीन याप्रमाणे ही पथक कार्यान्वीत राहणार आहेत. या पथकात वरिष्ठ अधिकारी, दोन पोलीस कर्मचारी,कार्यकारी दंडाधिकारी, कॅमेरामन यांचा समावेश असणार आहे.

२२ तपासणी नाके

निवडणुकीत अवैध दारू तसेच पैशाची वाहतूक रोखता यावी यासाठी जिल्ह्यात २२तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. या तपासणी नाक्यावर पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. यामुळे निश्चितच अवैध धंद्यांना आळा बसेल असा विश्वास गेडाम यांनी व्यक्त केला.

Web Title: In order to keep an eye on illegal activities in Sindhudurg district, 12 pilots, 22 check posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.