दूध उत्पादकांना कृतीतून न्याय देणार : नीतेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 04:12 PM2018-07-18T16:12:04+5:302018-07-18T16:13:46+5:30

तुम्ही संघटित रहा. तुम्हांला कृतीतून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मी देतो, असे प्रतिपादन दूध उत्पादक मोर्चाला संबोधित करताना आमदार नीतेश राणे यांनी केले.

Nitesh Rane has given justice to the milk producers | दूध उत्पादकांना कृतीतून न्याय देणार : नीतेश राणे

दूध उत्पादकांना कृतीतून न्याय देणार : नीतेश राणे

Next
ठळक मुद्देदूध उत्पादकांना कृतीतून न्याय देणार : नीतेश राणेजिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारावर दूध उत्पादकांचा मोर्चा

सिंधुदुर्गनगरी : पश्चिम महाराष्ट्र भागाचे निकष कोकण प्रांतात लावून येथील दुग्धविकास होणार नाही. येथील भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. कोकणासाठी स्वतंत्र निकष झाले पाहिजेत. पश्चिम महाराष्ट्रासाठी ४० आमदार भांडत असतील पण कोकणासाठी मी एकटा पुरेसा आहे. मात्र, यासाठी तुमची ताकद महत्त्वाची आहे. तुम्ही संघटित रहा. तुम्हांला कृतीतून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मी देतो, असे प्रतिपादन दूध उत्पादक मोर्चाला संबोधित करताना आमदार नीतेश राणे यांनी केले.

दूध उत्पादकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारावर आल्यानंतर नीतेश राणे यांचे भाषण झाले. यावेळी आमदार राणे म्हणाले, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी गावोगावी जात दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये याविषयी जनजागृती केली. त्यामुळे एवढा मोठा प्रतिसाद लाभला. तुम्ही संघटित झालात.

आपण शांततेच्या मार्गाने आज आंदोलन केले. हेच आंदोलन महाराष्ट्राच्या अन्य भागात हिंसक बनले आहे. त्यामुळे शासनाने आम्हांला तिसरा डोळा उघडायला लावू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: Nitesh Rane has given justice to the milk producers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.