वेंगुर्लेत भाजपाच्या बुथप्रमुखांची बैठक, पक्षाचा प्रचार करण्याकरिता सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 05:40 PM2019-03-27T17:40:57+5:302019-03-27T17:42:47+5:30

निवडणुकीसाठी पक्षाचा प्रचार करण्याकरिता भाजपाकडे अनेक मुद्दे आहेत. पक्ष व मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात केलेले काम कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शक्तीकेंद्र्र प्रमुख व बुथप्रमुखांची आहे, असे प्रतिपादन तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी बैठकीवेळी केले.

Meet the BJP's Boothmen in Vengurle, and get ready to campaign for the party | वेंगुर्लेत भाजपाच्या बुथप्रमुखांची बैठक, पक्षाचा प्रचार करण्याकरिता सज्ज

वेंगुर्लेत भाजपाच्या बुथप्रमुखांची बैठक, पक्षाचा प्रचार करण्याकरिता सज्ज

Next
ठळक मुद्देवेंगुर्लेत भाजपाच्या बुथप्रमुखांची बैठकपक्षाचा प्रचार करण्याकरिता सज्ज

सिंधुदुर्ग : निवडणुकीसाठी पक्षाचा प्रचार करण्याकरिता भाजपाकडे अनेक मुद्दे आहेत. पक्ष व मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात केलेले काम कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शक्तीकेंद्र्र प्रमुख व बुथप्रमुखांची आहे, असे प्रतिपादन तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी बैठकीवेळी केले.

वेंगुर्ले येथील भाजपाच्या कार्यालयात सोमवारी तालुक्यातील शक्तीकेंद्र्र प्रमुखांची बैठक झाली. यावेळी जिल्हा चिटणीस साईप्रसाद नाईक, तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर, रवींद्र्र शिरसाट, नमो अ‍ॅपचे निखील नाईक, उभादांडा सरपंच गणपत केळुसकर यांच्यासह संजय परब (म्हापण),संजय दुधवडकर (परुळे), योगेश प्रभुखानोलकर (आडेली), पुरुषोत्तम कोचरेकर (वायंगणी), संतोष शेटकर (तुळस), सोमा मेस्त्री (मातोंड), निलेश मांजरेकर (उभादांडा), विजय बागकर (आसोली), महेश कोनाडकर (रेडी), सतीश धानजी (शिरोडा), सुहास गवंडळकर (वेंगुर्ले शहर) आदी उपस्थित होते.

या बैठकीत पक्ष संघटना बांधणीच्या दृष्टीने तालुक्यातील पंचायत समिती गण व नगरपरिषद हद्दीतील अशा पद्धतीने शक्तीकेंद्र्रांची निर्मिती करण्यात आली असून, शक्तीकेंद्र्रेनिहाय मेळावे घेण्याचे निश्चित करण्यात आले.

Web Title: Meet the BJP's Boothmen in Vengurle, and get ready to campaign for the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.