Mangaon Dutt Temple Rudra Dattayag Soula, Digambara, Dighambar Jayghosh | सिंधुदुर्ग : माणगाव दत्त मंदिरात रुद्र दत्तयाग सोहळा, दिगंबरा, दिगंबराचा जयघोष

माणगाव : येथील दत्त मंदिरात श्री रुद्र दत्तयाग सोहळा उत्साहात व असंख्य भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषाने माणगावनगरी दुमदुमली.

दत्तयाग सोहळ्यानिमित्त पूजा, अभिषेक, महापूजा, श्री दत्तयाग जप व हवन आदी विविध कार्यक्रम पार पडले. श्री प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांच्या ध्यानधारणा गुहेवर श्री दत्त पूजेचे आयोजन केले होते. भाविकांनी दर्शन व तीर्थप्रसादाचा लाभ घेतला.

तसेच दत्त मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सलग चार दिवस वाहनांची वर्दळ असल्यामुळे विश्वस्त मंडळातर्फे वाहतूक पोलीस चौकी लावण्यात आली होती.

सोहळ्यासाठी भव्य सभामंडप तसेच मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला होता.

चार दिवस चाललेल्या या सोहळ्यासाठी जिल्ह्यासह मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव आदी ठिकाणचे भाविक माणगावनगरीत दाखल झाल्याने माणगाव परिसर गजबजून गेला होता.

 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.