Lok Sabha Election 2019 विरोधकांनी फसवणूकीचे धंदे आता सोडावेत!-प्रमोद जठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 12:06 PM2019-04-17T12:06:05+5:302019-04-17T12:15:37+5:30

कणकवली :   सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील जनतेला  शांतता हवी आहे.शिवसेना भाजपच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास गतीने होत आहे. त्यामुळे विकासकामात कोणी खीळ घालू नये. विरोधकांनी भूलथापा ...

Lok Sabha Election 2019 Opponents drop fraud business now! -Promod Jathar | Lok Sabha Election 2019 विरोधकांनी फसवणूकीचे धंदे आता सोडावेत!-प्रमोद जठार

Lok Sabha Election 2019 विरोधकांनी फसवणूकीचे धंदे आता सोडावेत!-प्रमोद जठार

Next
ठळक मुद्देकणकवलीत महायुतीची पत्रकार परिषद -उद्धव ठाकरे १८रोजी कणकवलीत !

कणकवली :   सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील जनतेला  शांतता हवी आहे.शिवसेना भाजपच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास गतीने होत आहे. त्यामुळे विकासकामात कोणी खीळ घालू नये. विरोधकांनी भूलथापा मारून जनतेची फसवणूक करण्याचे धंदे आता तरी सोडून द्यावे. अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केली . 

   कणकवली येथील विजय भवन येथे महायुतीची पत्रकार परिषद मंगळवारी झाली .यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, भाजप नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, नीलम पालव, सचिन सावंत, नगरसेवक सुशांत नाईक, गीतेश कडू,तेजल  लिंग्रज , तेजस राणे आदी पदाधिकारी  उपस्थित होते. 

            यावेळी प्रमोद जठार म्हणाले ,सिंधुदुर्गात गाडी जाळणारी गॅंग आहे. कणकवलीतही गाडया जाळण्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु जाळपोळीचा त्यांचा हा शेवटचा प्रयत्न  आहे. यापुढे जनता ते खपवून घेणार नाही. राणेंच्या साम्राज्याचा कचरा २००९ साली  मी निवडून आलो त्यावेळी झाला. आता त्याच कचऱ्यावर ९०० कोटींचा प्रकल्प ते उभारत आहेत.

         शिवसेना भाजप मध्ये जे मतभेद होते ते दूर झाले आहेत. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकदिलाने काम करीत आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या ज्या शंका होत्या त्या आम्ही दूर केल्या आहेत. विनायक राऊत यांनी देखील  खासदार निधीवर युतीतील सर्व पक्षांचा  अधिकार  आहे अशी ग्वाही दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

              ते पुढे म्हणाले, विनायक राऊत हे गरीब कुटूंबातून खासदार पदापर्यत पोहचले आहेत. गरिबीची लाज न बाळगता मुंबईत कपबश्या विकण्याचे काम त्यांनी केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील चहा विकण्याचे काम केले असल्याने या दोन्ही नेत्यांना गरिबीची जाण आहे. त्यामुळे गरिबांसाठी ते चांगले काम करतील.

       वैभव नाईक म्हणाले,  ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत महायुती झाली तशीच विधानसभा निवडणुकीतही होईल. एकजुटीने विरोधकांना चारी मुंड्या चित करण्यात येईल. जनतेचे प्रश्न सोडविण्याचा  प्रयत्न आम्ही सातत्याने करीत आहोत. त्यामुळे विरोधकांनी नुसती टीका करीत बसण्यापेक्षा विकासाबाबत बोलावे. 

 

उद्धव ठाकरे १८रोजी कणकवलीत !

सिंधुदुर्ग -रत्नागिरी मतदारसंघातील लोकसभेचे उमेदवार खासदर विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी  शिवसेना ,भाजपा ,रिपाई, रासप महायुतीची जाहीर प्रचार सभा १८ एप्रिल  रोजी कणकवलीत होणार आहे.  या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, शिक्षणमंत्री विनोद तावडे , उद्योगमंत्री सुभाष देसाई,  मार्गदर्शन करणार आहेत. पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक , आमदार प्रसाद लाड व महायुतीचे सर्व नेते पदाधिकारी तसेच  कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती यावेळी प्रमोद जठार यांनी दिली.

Web Title: Lok Sabha Election 2019 Opponents drop fraud business now! -Promod Jathar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.