मच्छिमारी नौकेवर विजेचा लोळ: दोन लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 07:51 PM2019-06-08T19:51:21+5:302019-06-08T19:52:50+5:30

वायंगणी समुद्रकिनारी गुरुवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास श्री देव रवळनाथ पारंपरिक मच्छिमार (रापण) यांच्या मच्छिमारी नौकेवर विजेचा लोळ पडला. त्यामुळे मच्छिमारी नौकेचे सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणाला इजा झालेली नाही.

 Lightning litter on fishery boat: loss of two lakhs | मच्छिमारी नौकेवर विजेचा लोळ: दोन लाखांचे नुकसान

वायंगणी येथे नौकेवर विजेचा लोळ पडल्याने नौकेचे नुकसान झाले.

Next
ठळक मुद्दे मच्छिमारी नौकेवर विजेचा लोळ: दोन लाखांचे नुकसानवायंगणी समुद्र किनाऱ्यावरील घटना

वेंगुर्ले : वायंगणी समुद्रकिनारी गुरुवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास श्री देव रवळनाथ पारंपरिक मच्छिमार (रापण) यांच्या मच्छिमारी नौकेवर विजेचा लोळ पडला. त्यामुळे मच्छिमारी नौकेचे सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणाला इजा झालेली नाही.

वायंगणी किनाऱ्यावर मच्छिमारी करणारा हा जुना रापण संघ आहे. जून महिना सुरू झाल्याने मासेमारी बंदी कालावधी सुरू झाला आहे. त्यातच गुरुवारी पहाटे ढगांच्या गडगडाटासह विजांच्या लखलखाटात पाऊस सुरू झाला.

समुद्राचे पाणी वाढत होते. किनाऱ्यांवर असलेल्या आपल्या मच्छिमारी नौकेत पाणी जाऊ नये यासाठी ही नौका मागे ओढण्यासाठी ताता केळजी, बाळू भगत, नाना कोचरेकर, दादा मसुरकर, आबा मुनणकर आदी प्रयत्न करीत होते.

त्याचवेळी आकाशातून एक विजेचा लोळ नौकेवर कोसळला. त्यामुळे नौकेला मुख्य बाजूने मोठी उभी भेग पडून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने यावेळी त्याठिकाणी असलेले बाजूला झाल्याने मोठा अनर्थ टळला.
 

Web Title:  Lightning litter on fishery boat: loss of two lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.