कलमठ, पिसेकामसे, वरवडे, बिडवाडीत विकास कामांची भुमीपुजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 11:57 AM2019-01-18T11:57:37+5:302019-01-18T11:59:04+5:30

त. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आम्हाला दिलेली शिकवण आहे, ती म्हणजे दिलेला शब्द पाळला पाहीजे.त्यामुळे समाजात विविध विकासकामांचा दिलेला शब्द पाळणे हा खरा धर्म आम्ही मानतो, असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी येथे केले.

Kalamath, Pisekamse, Varvade, Bidwadi, Bhumipujan of development works | कलमठ, पिसेकामसे, वरवडे, बिडवाडीत विकास कामांची भुमीपुजन

कणकवली तालुक्यातील विविध विकासकामांचे भुमिपुजन आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वरूपा विखाळे, मिलिंद मेस्त्री, देविका गुरव, संदीप मेस्त्री, प्रकाश सावंत, सोनू सावंत, रामू विखाळे आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देकलमठ, पिसेकामसे, वरवडे, बिडवाडीत विकास कामांची भुमीपुजनेसमाजाला दिलेला शब्द पाळणे हाच खरा धर्म : नीतेश राणे यांचे प्रतिपादन

कणकवली : कणकवली तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय घेवुनच दिवसरात्र आम्ही आणि आमचे कार्यकर्ते काम करत आहोत. समाजाला पायाभुत सुविधा देण्यासाठी लागणारी शक्ती आम्ही सातत्याने पणाला लावत आहोत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आम्हाला दिलेली शिकवण आहे, ती म्हणजे दिलेला शब्द पाळला पाहीजे.त्यामुळे समाजात विविध विकासकामांचा दिलेला शब्द पाळणे हा खरा धर्म आम्ही मानतो, असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी येथे केले.

कणकवली तालुक्यातील विविध गावांमध्ये विकास कामांच्या भुमिपुजन प्रसंगी आमदार नीतेश राणे यांनी नागरिकांशी मुक्त संवाद साधला. यावेळी कलमठ, पिसेकामते, वरवडे, बिडवाडी या चार गावांमधील विविध विकासकामांचे भुमिपुजने गुरुवारी नीतेश राणे यांच्या हस्ते झाली.


यावेळी जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा विखाळे, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, प्रकाश सावंत, सरपंच देविका गुरव, सतीश नाडकर्णी, सोनू सावंत,आबा कोरगावकर, निसार शेख, महिला स्वाभिमान विभागप्रमुख विनीता बुचडे, स्वप्नील चिंदरकर, श्रद्धा कदम, सचिन बांदिवडेकर, सायली पवार, डॉ.शमिता बिरमोळे, सुरेश वर्देकर, डॉ. वैशाली कोरगावकर, सुहासिनी कांबळी, सुभाष मालांडकर, रामू विखाळे, अंकुश राणे, नीलिमा मसुरकर, मिलिंद चिंदरकर, समीर कवठणकर, नितीन पवार, बबन लोकरे, रविकांत मेस्त्री, संतोष लाड,माधवी काकडे, बंडू दंताळ, अण्णा मठकर, शेखर पेंढूरकर, राजू पेंढूरकर, गोविंद साळकर, गौरी साळकर,सुरज कुलकर्णी, सुभाष पोयेकर, जयप्रकाश मालंडकर, हिर्लेकर , तनोज कळसुलकर,विनोद पवार, प्रवीण सावंत,विलीस चोडणेकर उपस्थित होते

कणकवली तालुक्यातील कलमठ, पिसेकामते, वरवडे, बिडवाडी या चार गावांमध्ये आठ किलोमीटर लांबीचा रस्त्याचे भुमिपुजन करण्यात आले. त्यासाठी १ कोटी ९ लाख रुपयाचा निधी मंजुर झाला आहे. तसेच कलमठ गावातील बाजारपेठ शाळा रस्ता डांबरीकरण व गोसावीवाडी गजानन महाराज मंदीर येथुन जाणाऱ्या डांबरी रस्त्यासाठी ७ लाखाचा निधी मंजुर करण्यात आला आहे.
 

Web Title: Kalamath, Pisekamse, Varvade, Bidwadi, Bhumipujan of development works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.