वैभववाडी पंचायत समितीत खड्ड्यांचा मुद्दा गाजला, लोकमतच्या बातमीचा संदर्भ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 02:58 PM2018-07-14T14:58:09+5:302018-07-14T15:00:39+5:30

वैभववाडी तालुक्यातील रस्त्याच्या खड्डयांचा मुद्दा पंचायत समितीच्या सभेत चांगलाच गाजला. लोकमतच्या वृत्ताचा उल्लेख करुन वैभववाडी-फोंडा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे हैराण झालेले लोक दुरुस्ती परवडत नसल्याने वाहने विकून टाकण्याच्या मनस्थितीत असल्याचे सदस्य मंगेश लोके यांनी सभागृहात सांगितले.

The issue of potholes was raised in the Vaibhavwadi Panchayat Sammelan, reference of Lokmat's news | वैभववाडी पंचायत समितीत खड्ड्यांचा मुद्दा गाजला, लोकमतच्या बातमीचा संदर्भ

वैभववाडी पंचायत समितीत खड्ड्यांचा मुद्दा गाजला, लोकमतच्या बातमीचा संदर्भ

ठळक मुद्देवैभववाडी पंचायत समितीत खड्ड्यांचा मुद्दा गाजलालोकमतच्या बातमीचा संदर्भ : अवजड वाहतुकीचा जामदा पुलास धोका

वैभववाडी : तालुक्यातील रस्त्याच्या खड्डयांचा मुद्दा पंचायत समितीच्या सभेत चांगलाच गाजला. लोकमतच्या वृत्ताचा उल्लेख करुन वैभववाडी-फोंडा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे हैराण झालेले लोक दुरुस्ती परवडत नसल्याने वाहने विकून टाकण्याच्या मनस्थितीत असल्याचे सदस्य मंगेश लोके यांनी सभागृहात सांगितले.

तर महामार्ग चौपदरीकरणाच्या अवजड वाहतुकीमुळे खारेपाटण तिथवली रस्ता खचत चालला असून जामदापूल कोसळण्याची भीती उपसभापती हर्षदा हरयाण यांनी व्यक्त केली आहे.

सभापती लक्ष्मण रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभा झाली. सभेला उपसभापती हर्षदा हरयाण, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहाय्यक गटविकास अधिकारी शशिकांत भरसट, सदस्य अरविंद रावराणे, मंगेश लोके, अक्षता डाफळे व खातेप्रमुख उपस्थित होते.

तोच धागा पकडून उपसभापती हर्षदा हरयाण यांनी महामार्ग चौपदरीकरणाचे ठेकेदार ह्यकेसीसी बिल्डकॉनह्ण कंपनीची क्रशर तिथवलीत असल्याने अवजड वाहतुकीमुळे खारेपाटणपर्यंत ठिकठिकाणी रस्ता खचला असून जामदापूल कोसळण्याची भीती व्यक्त केली.

त्यावेळी रस्त्याच्या दुरवस्थेची कबुली देत पाऊस थांबताच खड्डे भरण्याचे तर केसीसी बिल्डकॉनच्या अवजड वाहतुकीबाबत वरिष्ठांमार्फत महामार्ग ठेकेदार कंपनीशी पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकामचे उपविभागीय अधिकारी पी.जी. तावडे यांनी दिले. त्यावेळी खड्डे दगड-मातीऐवजी पावसाळी डांबराने भरण्याची सूचना सभापती रावराणे यांनी केली.

लोक वाहने विकून टाकण्याच्या मनस्थितीत

खड्डयांमुळे वाहन चालकांना करावी लागणारी कसरत आणि जनतेला होणाऱ्या त्रासाबाबतचे वैभववाडी-फोंडा मार्ग खड्डयात हरवला असे वृत्त लोकमतने शुक्रवारी प्रसिद्ध केले. या वृत्ताचा सभागृहात उल्लेख करुन सदस्य लोके यांनी बांधकामचे उपविभागीय अधिकारी तावडे यांना विचारणा केली. खड्डयांमुळे वाहनांचे नुकसान होत असून दुरुस्ती परवडत नसल्याने लोक वाहने विकून टाकण्याच्या मनस्थितीत असल्याचे सांगितले.
 

Web Title: The issue of potholes was raised in the Vaibhavwadi Panchayat Sammelan, reference of Lokmat's news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.