...अन्यथा रेल्वेच्या आंदोलनाचे नेतृत्व मी करेन, पालकमंत्री दीपक केसरकर यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 06:17 PM2019-05-19T18:17:34+5:302019-05-19T18:18:02+5:30

कोकण रेल्वेच्या प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ निर्णय घ्या. लोकांच्या मागण्या पूर्ण करा.

I will lead the movement of railways, Guardian Minister Deepak Kesarkar | ...अन्यथा रेल्वेच्या आंदोलनाचे नेतृत्व मी करेन, पालकमंत्री दीपक केसरकर यांचा इशारा

...अन्यथा रेल्वेच्या आंदोलनाचे नेतृत्व मी करेन, पालकमंत्री दीपक केसरकर यांचा इशारा

Next

- रामचंद्र कुडाळकर
तळवडे- कोकण रेल्वेच्या प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ निर्णय घ्या. लोकांच्या मागण्या पूर्ण करा. अन्यथा तुमच्या विरोधात संघटनेला सोबत घेऊन आंदोलन छेडून मला त्या आंदोलनाचे नेतृत्व करावे लागेल, असा इशारा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे कोकण रेल्वेचे एमडी संजय गुप्ता यांना दूरध्वनीद्वारे दिला. हे सांगितल्यावर 26 मे ही तारीख गुप्ता यांनी दिली, चालढकल पुढे करत होते, दरम्यान याबाबत नियोजन करण्यासाठी 26 तारखेला पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात बैठक घेऊन पुढील भूमिका ठरवण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

केसरकर यांनी आज येथे मळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या लाक्षणिक उपोषण आला भेट दिली. दरम्यान केसरकर यांनी दूरध्वनीद्वारे गुप्ता यांचे संपर्क साधला. प्रवाशांच्या मागण्या रास्त आहेत या ठिकाणी गाड्या थांबणे गरजेचे आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तात्काळ रेल्वे संदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करा अन्यथा तुमच्या विरोधात आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा यावेळी दिला. दरम्यान आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास कधीही व प्रशासनाला सूचना न देता रेल्वे रोखू, असा इशारा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डी. के. सावंत यांनी दिला आहे.

यावेळी कोकण रेल्वेचे अधिकारी शेयलेश आबर्डेकर, मातोंडकर, मंजुनाथ सागर तसेच माजी आमदार राजन तेली, नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी जिल्हा परिषद रेश्मा सावंत, अक्रम खान, नगरसेवक बाबू कुडतरकर, अफरोज राजगुरू, नकुल पार्सेकर, प्रमोद गावडे, संजय तानावडे, राजू कासकर, इफ्तिकार राजगुर, जिल्हा परिषद सदस्य उत्तम पांढरे, गणेशप्रसाद पेडणेकर, कल्पना बांदेकर, बाळा जाधव, अन्वर खान, राजू परब, चंद्रकांत गावडे, नागेश गावडे, अजय तानावडे, संजू कानसे, संदीप आंगचेकर, भाई देऊलकर, अशोक देसाई, विनोद रेडकर, आर.डी. बांदेकर, अभिमन्यू लोंढे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: I will lead the movement of railways, Guardian Minister Deepak Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.