सिंधुदुर्ग : पालकमंत्र्यांनी जनतेप्रमाणेच पत्रकारांची केली फसवणूक : उपरकर यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:37 PM2018-12-24T12:37:42+5:302018-12-24T12:39:14+5:30

सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्यातील जनतेची खोट्या घोषणा करून आतापर्यंत फसवणूक केली आहे. त्याच धर्तीवर सिंधुदुर्गातील बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकासाठी निविदा प्रक्रिया होऊनही निधी देण्यामध्ये सातत्याने टाळाटाळ केली आहे. त्यामुळे पत्रकार संघटनेने जाहीर केलेल्या पालकमंत्री घेराव आंदोलनात मनसे ठिकठिकाणी सक्रिय सहभाग घेणार आहे, अशी माहिती मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.

Guardian minister cheated journalists just like people: Cheating over | सिंधुदुर्ग : पालकमंत्र्यांनी जनतेप्रमाणेच पत्रकारांची केली फसवणूक : उपरकर यांची टीका

सिंधुदुर्ग : पालकमंत्र्यांनी जनतेप्रमाणेच पत्रकारांची केली फसवणूक : उपरकर यांची टीका

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी जनतेप्रमाणेच पत्रकारांची केली फसवणूक :उपरकर यांची टीका जांभेकर स्मारकासाठी निधी देण्यास टाळाटाळपालकमंत्र्यांच्या घेरावात मनसेचा सक्रिय सहभाग

कणकवली : सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्यातील जनतेची खोट्या घोषणा करून आतापर्यंत फसवणूक केली आहे. त्याच धर्तीवर सिंधुदुर्गातील बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकासाठी निविदा प्रक्रिया होऊनही निधी देण्यामध्ये सातत्याने टाळाटाळ केली आहे. त्यामुळे पत्रकार संघटनेने जाहीर केलेल्या पालकमंत्री घेराव आंदोलनात मनसे ठिकठिकाणी सक्रिय सहभाग घेणार आहे, अशी माहिती मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.

कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, शहराध्यक्ष शैलेंद्र नेरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. परशुराम उपरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकासाठी पालकमंत्र्यांनी अनेकदा निधीची घोषणा केली.

स्मारकासाठी आवश्यक असलेला निधी देण्यामध्ये वेळ आणि निधीची आकडेवारी जाहीर करूनही पालकमंत्री आता दुर्लक्ष करीत आहेत. जनतेबरोबर खोटे बोलतानाच पत्रकारांशीही खोटे बोलून स्मारकासाठी निधी न देता त्यांची दिशाभूल करण्याचे काम त्यांनी केले आहे.

पालकमंत्र्यांनी १२ डिसेंबरपासून चिपी विमानतळावर आठवड्यातून तीन वेळा विमान उतरणार अशी घोषणा केली होती. त्या घोषणेनुसार माल्टा कंपनीशी करार झाल्याची खोटी बतावणी करून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोपही परशुराम उपरकर यांनी यावेळी केला़

Web Title: Guardian minister cheated journalists just like people: Cheating over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.