चाकूहल्ला प्रकरणातील युवती अद्यापही गंभीरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 07:53 PM2019-05-15T19:53:15+5:302019-05-15T19:54:51+5:30

चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या त्या अल्पवयीन युवतीवर बांबुळी-गोवा येथे रविवारी रात्री उशिरा शस्त्रक्रिया करण्यात आली असून, अद्यापही तिची अवस्था गंभीर असल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले.

The girl in the Chakkahah case is still serious | चाकूहल्ला प्रकरणातील युवती अद्यापही गंभीरच

याच सार्वजनिक विहिरीवर युवती पाणी भरण्यासाठी आली असता प्रियकराने तिच्यावर हल्ला केला.

Next
ठळक मुद्देचाकूहल्ला प्रकरणातील युवती अद्यापही गंभीरचदोडामार्ग येथील घटना : प्रियकरावर अंत्यसंस्कार

दोडामार्ग : प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या गैरसमजातून प्रेयसीच्या अंगावर धारदार चाकूने सपासप वार करून तिला गंभीर जखमी केल्यानंतर त्याच चाकूने स्वत:वर वार करून आत्महत्या करणारा प्रियकर गोकुळदास रावजी काळकेकर (२५) याच्यावर सोमवारी दुपारी शोकाकूल वातावरणात वझरे-काळकेकरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या त्या अल्पवयीन युवतीवर बांबुळी-गोवा येथे रविवारी रात्री उशिरा शस्त्रक्रिया करण्यात आली असून, अद्यापही तिची अवस्था गंभीर असल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले.

वझरे-काळकेकरवाडी येथे एखाद्या चित्रपटात शोभेल अशी थरारक घटना प्रेमप्रकरणात झालेल्या गैरसमजातून रविवारी सायंकाळी घडली आणि संपूर्ण तालुका सुन्न झाला. रविवारी दुपारी गावातीलच एका लग्नसोहळ््याला हे प्रेमीयुगुल जाऊन आले आणि त्यानंतर गैरसमजातून दोघात बाचाबाचीचा प्रकार घडला. हाच राग मनात ठेवून गोकुळदास काळकेकर होता. तो आपल्या प्रेयसीला माझी नाही तर कोणाचीच होऊ देणार नाही या इराद्याने अद्दल घडविण्याची वाट पाहू लागला.

सायंकाळी संबंधित अल्पवयीन युवती सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी आली असता आधीच संधीची वाट पाहत असलेला गोकुळदास याने विहिरीवर येऊन तिच्याशी हुज्जत घातली आणि रागाने तिच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले.

दहा ते बारा ठिकाणी त्याने वार केले. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या प्रेयसीला पाहिल्यावर गोकुळदासने स्वत:चे जीवन संपविण्याचे ठरविले. एका प्लास्टिक बाटलीतून आणलेले विषारी द्र्रव्य त्याने प्राशन केले आणि नंतर प्रेयसीवर वार करण्यासाठी आणलेल्या चाकूने स्वत:ला भोकसून घेत आत्महत्या केली.

गंभीर जखमी झालेल्या त्या युवतीला अत्यवस्थ अवस्थेत प्रथम दोडामार्ग व नंतर बांबोळी-गोवा येथे उपचारासाठी नेण्यात आले. रविवारी रात्री उशिरा तिच्यावर बांबोळी येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, अद्यापही तिची प्रकृती चिंताजनक असून, तिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

शस्त्रक्रियेनंतरही ती सोमवारी उशिरापर्यंत बेशुद्धावस्थेत होती. तर मृत हल्लेखोर प्रियकर गोकुळदास काळकेकर याचा मृतदेह सोमवारी शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

पोलिसांकडून हल्ल्यातील साहित्य जप्त

पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा हल्ल्यात वापरण्यात आलेले साहित्य जप्त केले. यात चाकू, संबंधित युवतीची घटनास्थळावर आढळलेली चप्पल, गोकुळदास याने आणलेल्या विषारी द्र्रव्याची बाटली आदी वस्तूंचा समावेश आहे.

मृत प्रियकरावर गुन्हा दाखल

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी मृत हल्लेखोर प्रियकर गोकुळदास काळकेकर याच्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुजित घाडगे तपास करीत आहेत.
 

Web Title: The girl in the Chakkahah case is still serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.