कुडाळ बाजारपेठेतील चार दुकाने फोडली, अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 09:44 PM2018-01-16T21:44:11+5:302018-01-16T21:44:31+5:30

बाजारपेठेतील चार मोठी दुकाने चोरट्यांनी सोमवारी रात्री फोडून ५० हजार रुपयांच्या रोख रकमेसह सुमारे २.५ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

Four shops of the Kudal market collapsed, two lakh lankas worth lakhs | कुडाळ बाजारपेठेतील चार दुकाने फोडली, अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास

कुडाळ बाजारपेठेतील चार दुकाने फोडली, अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास

Next

कुडाळ : बाजारपेठेतील चार मोठी दुकाने चोरट्यांनी सोमवारी रात्री फोडून ५० हजार रुपयांच्या रोख रकमेसह सुमारे २.५ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. पोलिसांची गस्त सुरू असताना झालेल्या या चोरीमुळे तपासाचे आव्हान असून येथील दुकानदारांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटे या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कुडाळ बाजारपेठेतील रेणुका स्वीट मार्ट, कुडाळ मेडिकल, धडाम यांचे दुकान व मनीष फोटो स्टुडिओ अशी चार दुकाने एकाच रात्रीत फोडली. मंगळवारी सकाळी मालकांनी दुकाने उघडल्यावर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात तत्काळ माहिती देण्यात आली.

रेणुका स्वीट मार्टचे मालक जालिमसिंह पुरोहित यांनी तक्रार दिली. कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जी. जी. पाटील तसेच पोलीस एस. डिसोजा व इतर पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. कुडाळ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांच्या तपासासाठी पाचारण केलेल्या पथकातील श्वान रेणुका स्वीट मार्टकडून कुडाळ एसटी स्थानकाच्या परिसरात घुटमळले. ठसे तज्ञ्ज्ञांनीही परिसरातील काही ठिकाणच्या ठशांचे नमुने घेतले आहेत.

रेणुका स्वीट मार्ट या दुकानाच्या एका खिडकीचे लोखंडी गज कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला. या दुकानातील रोख ३५ हजार रुपये तसेच सुमारे ३८ हजार रूपयांचा लॅपटॉप व मोठ्या प्रमाणात काजूची पाकिटे चोरून नेली. याच दुकानाच्या बाजूला असलेल्या मनोहर कामत यांच्या कुडाळ मेडिकल दुकानाचे शटरचे तोडून चोरट्यांनी या दुकानात प्रवेश करून रोख सहा हजार रूपयांची रक्कम व सुमारे पाच हजार रूपयांचे बॉडी स्प्रेच्या बाटल्या लंपास केल्या.

याच बाजारपेठेतील एका इमारतीच्या गाळ््यात असलेल्या सुरज खुडपकर यांच्या मनीष फोटो स्टुडिओच्या शटरची लोखंडी पट्टी कापून निकॉन डी-९० व डी-४० कंपनीचे दोन कॅमेरे व लेन्स मिळून सुमारे १ लाख रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. धडाम यांच्या स्वरूपानंद ट्रेडर्स या दुकानाच्या शटरला असलेली कुलपे न तुटल्याने या दुकानात चोरीचा प्रयत्न फसला.
चोरट्यांची टोळी असण्याची शक्यता
एकाच रात्रीत चार दुकाने फोडणे एकट्या-दुकट्यचो काम नसल्याने या चोरीमध्ये चोरट्यांची टोळी असण्याची दाट शक्यता आहे. बाजारपेठेतील या मार्गावर लावण्यात आलेल्या सर्व दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास चोरट्यांचा छडा लागू शकतो, अशी चर्चा नागरिकांत होती.
सीसीटीव्हीत एक चोरटा कैद
रेणुका स्वीट मार्टमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुकानातील पैसे चोरताना चोरटा कैद झाला आहे. त्याने पांढरा सदरा घातला असून डोक्याला व तोंडाला पांढरा कापड गुंडाळल्याचे दिसत आहे. पोलिसांची गस्त असलेल्या तसेच रहदारी व भरवस्तीमधील दुकानात ही चोरी झाली असून या चोरट्यांचा शोध घेणे कुडाळ पोलिसांना आव्हान ठरणार आहे.

Web Title: Four shops of the Kudal market collapsed, two lakh lankas worth lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.