देवगड समुद्र किनाऱ्यावरील मारहाण प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 06:18 PM2017-10-24T18:18:31+5:302017-10-24T18:22:35+5:30

मागील वाकडीकीच्या कारणावरून देवगड समुद्रकिनारी वाळूवर बोलावून घेऊन जयदेव नारायण कांदळगांवकर व राकेश गगनसिंंग वाल्मिकी (रा. देवगड) यांना मारहाण केल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी किल्ला येथील पाचजणांविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. ही घटना सोमवारी दुपारी २.३० वाजण्याचा सुमारास घडली.

Five accused in Devgadh seacoast case | देवगड समुद्र किनाऱ्यावरील मारहाण प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

देवगड समुद्र किनाऱ्यावरील मारहाण प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देवाकडीकीच्या कारणावरून ठोशाने मारहाण देवगड पोलीस स्थानकात तक्रार पोलिसांनी केला गुन्हा दाखल

देवगड , दि. २४ : मागील वाकडीकीच्या कारणावरून देवगड समुद्रकिनारी वाळूवर बोलावून घेऊन जयदेव नारायण कांदळगांवकर व राकेश गगनसिंंग वाल्मिकी (रा. देवगड) यांना मारहाण केल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी किल्ला येथील पाचजणांविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. ही घटना सोमवारी दुपारी २.३० वाजण्याचा सुमारास घडली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड किल्ला येथील अझर शेख, अमोल गोळवणकर, नथुराम मणचेकर, अल्ताफ होलसेकर व नीतेश तेली यांनी सोमवारी दुपारी २ वाजण्याचा सुमारास फोन करून जयदेव नारायण कांदळगांवकर याला देवगड समुद्रकिनारी वाळूवर बोलावून घेतले.


जयदेव कांदळगांवकर हा त्याचा सहकारी राकेश गगनसिंंग वाल्मिकी याच्यासमवेत देवगड समुद्रकिनारी वाळूवर गेला असता मागील वाकडीकीच्या कारणावरून पाचहीजणांनी त्यांना हाताच्या ठोशाने मारहाण केली.

या मारहाणप्रकरणी जयदेव नारायण कांदळगांवकर यांनी देवगड पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून किल्ला येथील अझर शेख, अमोल गोळवणकर, नथुराम मणचेकर, अल्ताफ होलसेकर व नीतेश तेली या पाचहीजणांना अटक केली. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर शिवगण करीत आहेत.

Web Title: Five accused in Devgadh seacoast case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.