ठळक मुद्देधनगरवाडीकडे लक्ष देवून वाडीचा शासनाने विकास करावा वाडीतील ग्रामस्थांना अद्यापही करावी लागते पायपीट

सिंधुदुर्गनगरी ,दि. ०२ : मालवण तालुक्यातील वायंगवडे धनगरवाडी गेली कित्येक वर्षे विकासापासून वंचित आहे. या धनगरवाडीतील ग्रामस्थांना अद्यापही पायपीट करावी लागत आहे. या वाडीकडे आतातरी शासनाने लक्ष दयावा अशी मागणी वायंगवडे धनगरवाडी येथील ग्रामस्थ नाना शिंदे, रामा शिंदे यांनी केली आहे.

वायंगवडे गावातील धनगरवाडी गेली अनेक वर्षे विकासापासून वंचित आहे. या वाडीकडे कॉंग्रेस सरकारने दुर्लक्ष केलाच मात्र आता विद्यमान शासनही या वाडीकडे दुर्लक्ष करीत आहे. या वाडीचा आतापर्यंत कोणताच विकास झालेला नाही. या वाडीत ना लाईट आहे, ना रस्ता व पाणी नाही. ही वाडी डोंगरात वसलेली असल्याने येथील मुलांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागते. एखादा रुग्ण असल्यास त्याला खांद्यावरून घेवून यावे लागते.

वाडीत लाईट नसल्याने रात्रीच्या वेळी जंगली प्राण्यांपासून बचावांसाठी जिव मुठित धरून वास्तव करावे लागते. विकसित होत चाललेल्या महाराष्ट्र राज्यात ही वाडी विकासापसून वंचित राहिली आहे.

याकडे ना कॉंग्रेस सरकारने लक्ष दिले ना विद्यमान सरकारने. झपाट्याने विकास होणाऱ्या महाराष्ट्रातील शासनाने या धनगरवाडी कडे लक्ष देवून या वाडीचा विकास करावा अशी मागणी येथील ग्रामस्थ राजन मोडक, रामा शिंदे व नाना शिंदे यांनी केली आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.