गायीला वाचवताना मालगाडीच्या धड़केने शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 02:30 PM2017-11-01T14:30:33+5:302017-11-01T14:35:31+5:30

रेल्वे ट्रॅकवरील गायीला वाचवताना मालगाडीचा धक्का बसून वाघेरी येथील विनोद लाड या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

The death of the farmer due to the trunk of the cargo while saving the cows | गायीला वाचवताना मालगाडीच्या धड़केने शेतकऱ्याचा मृत्यू

गायीला वाचवताना मालगाडीच्या धड़केने शेतकऱ्याचा मृत्यू

Next
ठळक मुद्देमालगाडीचा पाठीमागून धक्का लागून लाड गतप्राण गायीला रेल्वे ट्रॅक वरुन बाजूला घेत असताना धक्का

कणकवली : रेल्वे ट्रॅकवरील गायीला वाचवताना मालगाडीचा धक्का बसून वाघेरी येथील विनोद लाड या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

कणकवली तालुक्यातील वाघेरी कुळ्याचीवाडी येथील विनोद सोनू लाड ( 58 ) बुधवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास आपल्या गुरांना चरण्यासाठी घेवून रेल्वे ट्रॅक परिसरात गेले होते. यावेळी मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी मालगाडी येत असतानाच लाड यांची गाय रेल्वे ट्रॅकवरच पोहचली होती.

या गायीला रेल्वे ट्रॅक वरुन बाजूला घेत असतानाच मालगाडीचा पाठीमागून धक्का लागून विनोद लाड जागीच गतप्राण झाले. तर गायीचाही मृत्यू झाला. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

विनोद लाड यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व २ मुली असा परिवार आहे. लाड कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून वाघेरी गावावर शोककळा पसरली आहे.

Web Title: The death of the farmer due to the trunk of the cargo while saving the cows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.